malaika arora and arjun kapoor

अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मात्र त्यांच्या लग्नाच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

  मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor)यांनी २०१९ मध्ये  सोशल मीडियावरून आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. मागच्या काही दिवसांपासून हे दोघंही लवकरच लग्न (Malaika Arora And Arjun Kapoor Wedding) करणार असल्याची चर्चा सुरु आहे. हे लग्न कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पार पडणार असल्याचंही सांगितलं जात आहे. अर्जुन कपूरने याविषयी आता प्रतिक्रिया दिली आहे.

  arjun post

  गेल्या काही दिवसांपासून लग्नाच्या वृत्तामुळे चर्चेत असलेल्या अर्जुन कपूरनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.  त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर करताना लिहिलं, ‘मी या गोष्टीच्या प्रेमात पडलोय की, लोकांना माझ्यापेक्षा जरा जास्तच माझ्या आयुष्याबद्दल माहीत आहे.’

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)


  सूत्रांकडून माहितीनुसार, अर्जुन आणि मलायका या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मात्र त्यांच्या लग्नाच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.मलायका आणि अर्जुन नेहमीच त्यांच्या नात्याबद्दल बिनधास्तपणे बोलताना दिसतात. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत मलायका अरोरानं अर्जुनचं खूप कौतुक केलं होतं. लग्नाच्या चर्चांबद्दल बोलताना मलायका म्हणाली की, ती आणि अर्जुन कपूर यावर विचार करत आहेत. मलायका आणि अर्जुन या दोघांच्या वयात १२ वर्षांचं अंतर आहे. मलायका ४८ वर्षांची आहे तर अर्जुन ३६ वर्षांचा आहे.