arjun rampal and agisilaos

एनसीबीने अभिनेता अर्जुन रामपालची(Arjun Rampals`s Brother In Law Agisilaos Demetriades Arrested) गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सच्या भावाला पुन्हा अटक केली आहे.

    बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण (Bollywood Drugs Case) समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी एनसीबीने अभिनेता अर्जुन रामपालची(Arjun Rampals`s Brother In Law Agisilaos Demetriades Arrested) गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सच्या भावाला पुन्हा अटक केली आहे. मुंबई एनसीबी(Mumbai NCB) आणि गोवा एनसीबीने(Goa NCB) संयुक्त कारवाई कारवाई करत अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सला (Agisilaos Demetriades) गोव्यातून अटक केली आहे.

    आतापर्यंत या प्रकरणात अनेकांना ताब्यात घेतले गेले आहे. याआधीही एनसीबीने अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सच्या भावाला ताब्यात घेतले गेले होते. ड्रग्ज कनेक्शन तपासादरम्यान नाव समोर आल्याने अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक करण्यात आली असल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले होते. अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सच्या चौकशी दरम्यान अनेक नावे समोर आली होती.

    दक्षिण अफिकेचा नागरिक असलेला अ‍ॅगिसिलोस एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या ड्रग्ज तस्काराच्या संपर्कात होता. शिवाय त्याचाकडून ‘हॅश’ आणि ‘अल्प्राझोलम’ हे ड्रग्जदेखील जप्त करण्यात आले आहेत. त्याचे नाव समोर आल्याने त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, काही कालावधीनंतर त्यांला जामीन देण्यात आला होता.

    अर्जुन रामपाल याची लिव्ह इन गर्लफ्रेंड गब्रिएला हिची देखील चौकशी करण्यात आली होती. अर्जुन आणि गब्रिएला हे दोघे वांद्रे येथे राहतात. त्यांच्या सोबत गब्रिएला हिचा भाऊ अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्स हा देखील राहत होता. गेल्या महिन्यात एनसीबी अधिकाऱ्यांनी अ‍ॅगिसिलोस याला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले होते. वेगवेगळ्या प्रकारचे हे ड्रग्ज होते. तपासात अ‍ॅगिसिलोस हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांच्या संपर्कात असल्याचं उघड झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.