भावाच्या काळजीपोटी बहिण पोहोचली निजामुद्दीन दर्ग्यात, अर्पिता खाननं सलमान खानसाठी केली प्रार्थना !.

काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या घर गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार झाला होता. या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आता अर्पिता खान आपल्या भावासाठी प्रार्थना करण्यासाठी निजामुद्दीन दर्ग्यात गेली होती. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  गेल्या काही दिवसापासून  अभिनेता सलमान खान (Salman Khan) चर्चेत आहे. 14 एप्रिलच्या पहाटे दुचाकीवरून आलेल्या दोन शूटर्सनी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार केला. या प्रकरणी दोन आरोंपीना गुजरात मधून अटक करण्यात आली आहे. या घटनेनतर फॅन्ससह कलाकारांनीबी चिंता व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली होती. आता नुकतचं भाईजानला दुबईत एका सार्वजनिक कार्यक्रमात स्पॅाट करण्यात आलं. त्यावेळी फॅन्स त्याची काळजी करताना दिसले. सलमानची बहीण अर्पिता खानही भावासाठी प्रार्थना करण्यासाठी दिल्लीतील  निजामुद्दीन दर्ग्यात गेली होती. तिथे तिने दर्ग्यात जाऊन नमाज अदा केली आणि भावाच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली.

  अर्पितानं दर्गात नमाज अदा केली

  सलमान खानाला यापुर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. पण त्याच्या घरावर गोळीबार होण्याची ही पहिलीच वेळ होती. या गोळीबारामुळे खान कुटुंबीयांपासून त्यांच्या प्रियजनांपर्यंत सर्वांनाच काळजी वाटू लागली होती. अशातच त्याची बहीण अर्पिता खान भाऊ सलमान खान आणि कुटुंबासाठी प्रार्थना करण्यासाठी दर्ग्यात गेल्याचं पाहायला मिळालं. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. क्लिपमध्ये फुलांच्या ड्रेसमध्ये दिसत असून ती दर्ग्यात कुटुंबासाठी प्रार्थना करताना दिसत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Pallav Paliwal (@pallav_paliwal)

  सलमान खानचे आगामी चित्रपट

  सलमान खानकडे अनेक आगामी चित्रपट आहेत. यावर्षी ईदच्या मुहूर्तावर अभिनेत्याचा चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरी, त्याने त्याचा आगामी चित्रपट सिकंदरची घोषणा केली. त्याचा चित्रपट पुढच्या वर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सलमान खानकडे टायगर व्हर्सेस पठाण, किक २, द बुल असे अनेक चित्रपट आहेत.