यामी गौतमचा ‘आर्टिकल 370’ ची बॉक्स ऑफिसवर सुसाट, तिसऱ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी!

एकंदरीत चित्रपटानं 9.50 कोटींची कमाई केली आहे.

    अभिनेत्री यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात झाली आहे. रिलीजच्या दिवशी या चित्रपटाने केवळ 5 कोटी 9 लाख रुपयांचा व्यवसाय केला. मात्र, दुस-या दिवशी चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली असून चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 7 कोटी 5 लाखांचा व्यवसाय (Article 370 Box Office Collection Day 2) केला आहे. आता चित्रपटाच्या तिसऱ्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 10.25 कोटीची कमाई केली आहे.

    ‘आर्टिकल 370’ चं तिसऱ्या दिवशीचं बॅाक्स ऑफिस कलेक्शन किती?

    ज्योती देशपांडे, आदित्य धर आणि लोकेश धर निर्मित हा चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. इब्राहिम बलोच दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट केवळ 20 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.  सॅकनिकच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 5.75 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटानं 9.50 कोटीची कमाई केली. तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी चित्रपटानं 10.25 कोटीची कमाई केली. एकंदरीत चित्रपटानं 9.50 कोटींची कमाई केली आहे.

    कसा आहे आर्टिकल 370

    चित्रपटाबद्दल सांगायचं तर, आर्टिकल 370 जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद आणि भ्रष्टाचारावर आधारित आहे. यामीने या चित्रपटात इंटेलिजन्स ऑफिसरची भूमिका साकारली आहे. यामी आणि प्रियामणी यांनी जबरदस्त अभिनय केला आहे. इतकंच नाही तर अभिनेत्री देखील स्वतःच्या बळावर चित्रपट कसा उत्कृष्ट बनवू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट.