‘आर्टिकल 370’ ने जगभरात केला विक्रम! या चित्रपटाने जगभरात गाठला 100 कोटींचा गल्ला

यामी गौतम स्टारर हा चित्रपट केवळ भारतातच चांगले कलेक्शन करत नाही तर जगभरात बॉक्स ऑफिसवर आपला झेंडा फडकवत आहे.

  ‘आर्टिकल 370’ चित्रपटगृहांमध्ये आतापर्यंत आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. हा चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि अजूनही या चित्रपटाची चित्रपटगृहांमध्ये पकड कायम आहे. यामी गौतम स्टारर हा चित्रपट केवळ भारतातच चांगले कलेक्शन करत नाही तर जगभरात बॉक्स ऑफिसवर आपला झेंडा फडकवत आहे.

  यामी गौतम ‘आर्टिकल 370’ मध्ये फुल ॲक्शन अवतारात दिसली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 18 दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 65.94 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर या चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन आता 100 कोटी रुपयांच्या जवळ पोहोचले आहे. अभिनेत्रीने चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन शेअर केले आहे, त्यानुसार चित्रपटाने आतापर्यंत एकूण 95.23 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

  यामी गौतमच्या चार चित्रपटांनी ‘बाला’, ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’, ‘काबिल’ आणि ‘OMG 2’ ने जगभरात 100 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. ‘आर्टिकल 370’चे आताचे आलेले कलेक्शन पाहता हा चित्रपट जगभरात 100 कोटींहून अधिक कलेक्शन करणार असल्याचे दिसते. जर ‘आर्टिकल 370’ जगभरात 100 कोटींचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला तर यामी गौतमच्या करिअरमधील हा 100 कोटी रुपयांचा पाचवा चित्रपट ठरू शकतो.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Yami Gautam Dhar (@yamigautam)

  काय आहे चित्रपटाची कथा?
  यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ या चित्रपटात 2016 मधील काश्मीरमधील अशांततेची कहाणी दाखवण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयातील एका तरुण फील्ड एजंटची निवड दहशतवाद आणि भ्रष्टाचारावर कारवाई करण्यासाठी टॉप-सिक्रेट मिशनसाठी केली जाते. यामी गौतमने या एजंटची भूमिका साकारली आहे. आदित्य सुहाश जांभळे दिग्दर्शित ‘आर्टिकल 370’ या चित्रपटात यामी गौतम व्यतिरिक्त प्रियमणी, अरुण गोविल आणि दिव्या सेठ देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.