धक्कादायक सत्य! SRK ची मॅनेजर पूजा ददलानीने आर्यनला वाचविण्यासाठी ५० लाखांची दिली होती ऑफर?

सॅमचा दावा आहे की जेव्हा पूजाने एवढी मोठी रक्कम दिली होती तेव्हा तिला वाटले होते की, ती आर्यनला वाचवेल, पण जेव्हा हे शक्य झाले नाही तेव्हा ही रक्कम तिला परत करण्यात आली. पेशाने व्यापारी असलेले सॅम डिसूझा (Sam Dsouza) यांचा दावा आहे की, पूजा ददलानीने या खटल्यातील साक्षीदार केपी गोसावीला ५० लाख रुपये दिले.

  मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा (Sharukh Khan) मुलगा (son) आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Cruize Drugs Case) हळूहळू अनेक गोष्टी उघड होत आहेत. या खटल्यातील साक्षीदार प्रभाकर साईल याने अनेक खळबळजनक गोष्टी सांगितल्याने या प्रकरणाची दिशा बदलली. प्रभाकर साईलच्या प्रतिज्ञापत्रात सॅम डिसूझा नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. सॅम डिसूझाने एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत दावा केला आहे की, शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीने (Sharukh Khan’s Manager Pooja Dadlani) आर्यनला अटकेपासून वाचवण्यासाठी मोठी रक्कम देऊ केली होती.

  ‘केपी गोसावीला दिले होते ५० लाख’

  सॅमचा दावा आहे की जेव्हा पूजाने एवढी मोठी रक्कम दिली होती तेव्हा तिला वाटले होते की, ती आर्यनला वाचवेल, पण जेव्हा हे शक्य झाले नाही तेव्हा ही रक्कम तिला परत करण्यात आली. पेशाने व्यापारी असलेले सॅम डिसूझा (Sam D’Souza) यांचा दावा आहे की, पूजा ददलानीने (Pooja Dadlani) या खटल्यातील साक्षीदार केपी गोसावी (KP Gosavi) ला ५० लाख रुपये दिले. सॅमने सांगितले की, गोसावी धोकेबाज असल्याचे लक्षात येताच पूजाला पैसे परत केले.

  ‘२५ कोटींची मागणी करत होता गोसावी, पूर्ण ५० लाख परत केलेच नाहीत’

  केपी गोसावी, पूजा ददलानी आणि सॅम डिसूझा यांची भेट ३ ऑक्टोबरला सकाळी झाल्याचे प्रभाकर साईल यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. कारमध्ये एक व्यक्ती आला आणि त्याने प्रभाकर साईल याला दोन पिशव्या दिल्या ज्या त्याने सॅम डिसूझाजवळील ट्रायडंट हॉटेलमध्ये नेल्या. यानंतर डिसूझा यांनी त्या पिशव्यांमध्ये ठेवलेले पैसे मोजले, ते फक्त ३८ लाख रुपये होते. प्रभाकरने असा दावाही केला आहे की, गोसावी याचे संभाषण आपण ऐकले असून त्यात आपण २५ कोटी रुपयांची मागणी करत होता आणि त्यातील ८ कोटी रुपये एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना द्यायचे होते.

  ‘ गोसावी आहे धोकेबाज माणूस’

  सॅम डिसूझा यांनी आपल्या टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘खूप गैरवर्तन आणि दबावानंतर आम्हाला गोसावी यांच्याकडून ३८ लाख रुपये मिळाले. आम्ही उरलेली रक्कम मिक्स करून पूजा दादलानीला परत केली कारण आम्हाला कळले होते की, केपी गोसावी हा धोकेबाज माणूस आहे.