
आशीष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये दोघांच्या गळ्यात हार दिसत आहेत.
बॉलिवूड अभिनेते आशीष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. त्यांनी रुपाली बरुआ (Rupali Barua) यांच्यासोबत आज (25 मे) रजिस्टर्ड मॅरेज केलं आहे. आशीष आणि रुपाली यांनी लग्नानंतर रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती.
बायको करते तरी काय?
आयुष्याच्या या टप्प्यावर रुपालीशी लग्न होणे ही एक विलक्षण भावना आहे. असं आशीष यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं. रुपाली बरुआ यांचं कोलकातामध्ये एक फॅशन स्टोर आहे. रुपाली यांच्यासोबतच्या लव्ह स्टोरीबद्दल विचारण्यात आल्यानंतर आशीष म्हणाले, “अहो, ती एक मोठी कथा आहे. मी नंतर तुम्हाला सांगेल.” यावर रुपाली म्हणाल्या, “आम्ही काही काळापूर्वी भेटलो होतो आणि आम्ही आमचे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता. आमचे लग्न अगदी साधेपणाने व्हावे अशी आम्हा दोघांची इच्छा होती.”
View this post on Instagram
आशीष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये दोघांच्या गळ्यात हार दिसत आहेत. सध्या आशीष यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी शुभेच्छा देत आहेत. रुपालीपूर्वी आशीष विद्यार्थी यांनी अभिनेत्री राजोशीसोबत लग्न केले होते. राजोशी एक प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आणि नाट्य कलाकार आहेत.