संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा; अशोक सराफ, ऋतुजा बागवे, ढोलकीवादक विजय चव्हाण यांचा सन्मान!

संगीत नाटक अकादमीतर्फे संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

  कला विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमीतर्फे पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.  ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि विख्यात शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली (Kalapini Komkali) यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

  दरवर्षी संगीत नाटक अकादमीतर्फे संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना सन्मानित केलं जातं. नुकतचं या वर्षीच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील कलाकारांचा समावेश आहे. संगीत नाटक अकादमीच्या वतीने 2023 या वर्षासाठी संगीत, नाटक, नृत्य क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा केली आहे. एक लाख रुपये आणि ताम्रपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

  ‘या’ कलाकारांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार घोषित

  – अशोक सराफ, अभिनय
  – विजय शामराव चव्हाण, ढोलकीवादक
  – कलापिनी कोमकली, हिंदुस्तानी शास्त्रीय सगीत
  – नंदिनी परब गुजर, सुगम संगीत
  – सिद्धी उपाध्ये, अभिनय
  – महेश सातारकर, लोकनृत्य
  – प्रमिला सूर्यवंशी, लावणी
  – अनुजा झोकरकर, हिंदुस्तानी शास्त्रीय गायक
  – सारंग कुलकर्णी, सरोद वादक
  – नागेश आडगावकर, अभंग संगीत
  – ऋतुजा बागवे, अभिनय
  – प्रियांका शक्ती ठाकूर, पारंपारिक कला