
लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आतिफ अस्लम हा ‘क्या से क्या हो गए देखते देखते’ हे गाणं परफॉर्म करत होता. त्यावेळी त्याच्या एका चाहत्याने आतिफ अस्लमवर पैसे उधळले.
पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम (Atif Aslam) हा अनेकांचा आवडता गायक आहे. आतिफ अस्लमनं बॉलिवूड चित्रपटांमधील अनेक गाणी देखील गायली आहेत. आतिफ हा विविध लाईव्ह कॉन्सर्टमध्येही गात असतो. नुकत्याच एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान आतिफ अस्लमसोबत (Atif Aslam Live Concert) एक वेगळी घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आतिफ अस्लमचं कौतुक होत आहे. (Viral Video)
“My friend, Donate this money, don’t throw it at me, this is just disrespect to the money” How calmly he requested and gave a message to the jahil pakistanis who made this thing a culture. What a man he his, one and only undisputed pakistani star whom you should admire @itsaadee pic.twitter.com/KOSvUMvSha
— Faizi (@faizanriaz7_) October 24, 2023
लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आतिफ अस्लम हा ‘क्या से क्या हो गए देखते देखते’ हे गाणं परफॉर्म करत होता. त्यावेळी त्याच्या एका चाहत्याने आतिफ अस्लमवर पैसे उधळले. आतिफ अस्लमनं परफॉर्मन्स थांबवला आणि त्या चाहत्याला स्टेजच्या जवळ येण्याची विनंती केली. त्यानंतर आतिफ हा त्या चाहत्याला म्हणतो, “माझ्या मित्रा, हे सर्व पैसे दान कर, माझ्यावर टाकू नकोस. हा फक्त पैशाचा अपमान आहे.” लाईव्ह कॉन्सर्टमधील आतिफ अस्लमचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आतिफ अस्लमचे चाहते त्याचे कौतुक करत आहेत.
तू जाने ना, तेरा होने लगा हूं, तेरे संग यारा, दिल दियां गल्लां, तेरे बिन, वो लम्हे वो बातें, पिया ओ रे पिया या आतिफ अस्लमच्या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आतिफ अस्लम हा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आगामी गाण्यांची माहिती चाहत्यांना देतो. आतिफ अस्लमला इन्स्टाग्रामवर 7.4 मिलियन फॉलोवर्स आहेत. तसेच विविध ठिकाणी आतिफ अस्लमच्या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन देखील केले जाते.