Atul-Kulkarni

अतुल कुलकर्णी यांचे काम पाहिलेल्‍यांना कलेवरील त्‍याचे अविश्‍वसनीय प्रभुत्‍व आणि साकारत असलेल्‍या भूमिकेला सर्वोत्तम करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या क्षमतेबाबत चांगलेच माहित आहे. पण त्‍यांनी आतापर्यंत विनोदीशैली साकारलेली नाही. प्रबळ व डायनॅमिक भूमिकांसाठी त्‍यांची प्रशंसा करण्‍यात आलेली आहे, पण काहीजणांनाच त्‍यांची विनोदीशैली आणि हसवण्‍याच्‍या क्षमतेबाबत माहित आहे. आणि सोनी लिवची ओरिजिनल सिरीज 'सँडविच फॉरेव्‍हर'मध्‍ये त्‍यांची हीच क्षमता पाहायला मिळणार आहे. या सिरीजमध्‍ये ते निवृत्त रॉ एजंट व नैनाचे (आहाना कुमरा) वडिल व्‍ही. के. सरनाईकची भूमिका साकारत आहेत.

  • Atul kulkarni, play diffrent role, in Sandwich forever,अतबल कुलकर्णी, सॅण्डवीच फ़रेव्हर

या सिरीजमध्‍ये ते कडक शिस्‍तीच्या व्‍यक्‍तीची भूमिका साकारत आहेत, जो वेळी खूपच कडक वागतो. त्‍याचे एकमेव मिशन आहे, ते म्‍हणजे त्‍याचा जावई समीरला (कुणाल रॉय कपूर) शिस्‍तबद्ध बनवणे. त्‍यांच्‍या मते, समीर राज्‍यस्‍तरीय बॅडमिंटन खेळाडू असलेली त्‍याची मुलगी नैनासाठी योग्‍य जोडीदार नाही. त्‍यांच्‍यामधील विलक्षण गोष्‍टी, वडिल म्‍हणून त्‍याचे संबंधित आचारण व उत्‍स्‍फूर्त अभिनय असलेली ही सिरीज पाहिलीच पाहिजे अशी आहे. अतुल यांची मराठी अभिनेता म्‍हणून सुरूवात ते बॉलिवुडमध्‍ये खास उपस्थिती दर्शवण्‍यापर्यंत तसेच आता ओटीटी व्‍यासपीठांवर देखील प्रबळ उपस्थिती आहे. विविध भूमिका साकारण्‍यासोबत आता ‘सँडविच फॉरेव्‍हर’मध्‍ये विनोदीशैली साकारण्‍यापर्यंत अभिनेता पुन्‍हा एकदा सर्वोत्तम अभिनयाच्‍या माध्‍यमातून त्‍याच्‍याशी संबंधित असलेला समज मोडून काढणार आहे.

या भूमिकेबात बोलताना अभिनेता अतुल कुलकर्णी म्‍हणाले, ”एक कलाकार म्‍हणून मी माझ्या कम्‍फर्ट झोनपलीकडील भूमिका साकारण्‍याला प्राधान्‍य देतो आणि मी यापूर्वी न साकारलेल्‍या भूमिका साकारतो. या भूमिकेने मला मुख्‍य कन्टेन्टमध्‍ये कधीच न मिळालेली शैली साकारण्‍याची संधी दिली. माझ्या मर्यादांपलीकडील विविध पैलू शोधण्‍यामध्‍ये मदत करणा-या भूमिका मिळाल्‍याने मी स्‍वत:ला भाग्‍यवान समजतो. ‘सँडविच फॉरेव्‍हर’मध्‍ये असे उत्तम कलाकार व टीमसोबत काम करण्‍याचा अनुभव अद्भुत होता. मी २५ डिसेंबर रोजी या विलक्षणतेमध्‍ये प्रेक्षकांना सामावून घेण्‍यास खूपच उत्‍सुक आहे.”