pathaan audience response

शाहरुखचा ‘पठाण’ (Pathaan) चित्रपट प्रदर्शित झाला म्हटल्यावर देशभरातील चित्रपटगृहांबाहेर एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. सकाळी सात वाजता पहिला शो पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर तुफान गर्दी केली.

    गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान (Shahrukh Khan) व दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटाची प्रेक्षक खूप आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. प्रेक्षकांनी ‘पठाण’ पहिल्याच दिवशी पाहता यावा म्हणून आधीच बुकिंग (Pathaan Advance Booking) केले होेते. जवळपास ८ लाखांपेक्षा अधिक तिकिटे बुक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

    आता तर शाहरुखचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित झाला म्हटल्यावर देशभरातील चित्रपटगृहांबाहेर एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. सकाळी सात वाजता पहिला शो पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर तुफान गर्दी केली. हे  चित्र बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाले. चित्रपटगृहाबाहेरील गर्दीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Pathaan Audience Response) झाले आहेत.

    काही ठिकाणी शाहरुखच्या चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर चक्क फटाके फोडले. काही ठिकाणी ढोल-ताशावर चाहते आनंदाने नाचत असल्याचेही पाहायला मिळाले. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच सकाळचा पहिला शो पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर तुफान गर्दी केली असल्याचं चित्र सगळीकडेच पाहायला मिळाले. शाहरुखला बऱ्याच वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांनी दाखवलेला उत्साह कमालीचा आहे.

    ‘पठाण’ला मिळत असलेला प्रतिसाद पाहता हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करणार हे निश्चित. तर दुसरीकडे दीपिका व जॉन अब्राहमच्या भूमिकेचंही सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. सुरुवातीला या चित्रपटावरून बरेच वाद रंगले. मात्र त्याचा चित्रपटावर कोणताच परिणाम झाला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.