avatar 2

अवतार 2' चित्रपट शुक्रवारी रिलीज झाल्यानंतरने भारतात 41 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशीही या चित्रपटानं जवळपास 42-43 कोटींची कमाई केली आहे.

    अनेक दिवसापासून प्रेक्षक ज्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत होते तो अवतार – 2 (Avatar 2) म्हणजेच ‘अवतार द वे ऑफ वाटर’ (Avatar The Way Of Water) हा चित्रपट अखरे प्रदर्शित झाला. चित्रपट रिलीज होऊन दोन दिवस झाले आहेत. या चित्रपटला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय.  या चित्रपटानं पहिल्या दिवशी  चांगली कमाई केली असून दुसऱ्या दिवशी देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे.

    दुसऱ्या दिवशीही 42-43 कोटींची कमाई

    ‘अवतार 2’  चित्रपट शुक्रवारी रिलीज झाल्यानंतरने भारतात 41 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशीही या चित्रपटानं जवळपास 42-43 कोटींची कमाई केली आहे. दोन दिवसांत या चित्रपटानं जवळपास 83-84 कोटींचे कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने जगभरात दोन दिवसांमध्ये 1500 कोटींची कमाई केली आहे.

    ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ या सिनेमात प्रसिद्ध कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सॅम वर्थिंग्टन जेक सुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच जो सलदानादेखील (Zoe Saldana) महत्त्वाच्या भूमिकेत आहे. टायटॅनिक फेम अभिनेत्री केट विन्सलेट रोनलची भूमिका साकारत आहे. जिओव्हानी रिबिसी, जोएल डेव्हिड मूर, दिलीप राव, मॅट जेराल्ड, जॅक चॅम्पियन, एडी फाल्को, ब्रेंडन कॉवेल, मिशेल येओह आणि जेमेन क्लेमेंट या कलाकारांनी देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे.