avatar 2 and drishyam 2

‘दृश्यम २’(Drishyam 2) हा या वर्षातील भारतातील एक महत्त्वाचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १५ कोटींची कमाई केली होती. काल प्रदर्शित झालेल्या ‘अवतार २’ (Avatar 2) ने ‘दृश्यम २’च्या पहिल्या दिवशीच्या कमाईचा रेकॉर्ड मोडत ‘दृश्यम २’च्या जवळपास अडीच पट जास्त कमाई केली आहे.

  अवतार या चित्रपटाचा दुसरा भाग असलेला ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way Of Water) चित्रपट १६ डिसेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच सगळ्यांना या चित्रपटाविषयी उत्सुकता होती. प्रदर्शनाच्या आधीच या चित्रपटाला ॲडव्हान्स बुकिंगमधून भारतात तब्बल ४ कोटी रुपये मिळाले होते. आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. पहिल्या दिवशीच्या कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने ‘दृश्यम २’ (Drishyam 2) लाही मागे टाकलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Avatar (@avatar)

  ‘दृश्यम २’ हा या वर्षातील भारतातील एक महत्त्वाचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १५ कोटींची कमाई केली होती. काल प्रदर्शित झालेल्या ‘अवतार २’ने ‘दृश्यम २’च्या पहिल्या दिवशीच्या कमाईचा रेकॉर्ड मोडत ‘दृश्यम २’च्या जवळपास अडीच पट जास्त कमाई केली आहे.

  काही हजार स्क्रीन्सवर भारतात प्रदर्शित झालेल्या ‘अवतार २’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४० कोटींचा गल्ला जमवला. ‘अवतार २’चा हा रेकॉर्ड बघता लवकरच हा चित्रपट १०० कोटींचा आकडा पार करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. चित्रपटाचे देशातील सगळे शो हाऊसफुल होत आहेत. याआधी २००९ साली आलेल्या ‘अवतार’ने सर्वाधिक कमाईचा इतिहास रचला होता. एक अद्भुत विश्व या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळालं होतं. आता तब्बल १२ वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे आणखी ३ भाग येणार आहेत.