Awara yaala

आवरा याला’ (Awara Yala)हे गाणं यंदाच्या वरातीत वऱ्हाडयांना ठेका धरायला लावण्यास सज्ज झालं आहे.(New Marathi Wedding Song) ‘आवरा याला’ या गाण्यात नवऱ्या मुलाला लागलेली लगीनघाई आणि लग्नासाठी असलेली त्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

    पीबीए म्युझिक (PBA Music)प्रस्तुत आणि निर्माते अँजेला व तेजस भालेराव निर्मित खास ‘आवरा याला’ (Awara Yala)हे गाणं यंदाच्या वरातीत वऱ्हाडयांना ठेका धरायला लावण्यास सज्ज झालं आहे.(New Marathi Wedding Song) ‘आवरा याला’ या गाण्यात नवऱ्या मुलाला लागलेली लगीनघाई आणि लग्नासाठी असलेली त्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

    या गाण्याला गीतकार, संगीतकार आणि गायक म्हणून वैभव लोंढेची साथ लाभली आहे. या तीनही महत्वपूर्ण भूमिका सांभाळत त्यानं या गाण्यात अभिनयही केला आहे. या गाण्यात वैभवसोबत मानसी सुरवसे, प्रियंका जाधव, राहुल चव्हाण, तुषार खैर, अभिजीत थोरात हे कलाकार आहेत. राहुल आणि मानसीची जोडी या गाण्यात नववधू-वराच्या भूमिकेत दिसणार आहे. दरवर्षी दिवाळीचे फटाके वाजल्यानंतर लग्नाचे बार उडत असतात. अशा वातावरणात रसिकांच्या भेटीला आलेलं ‘आवरा याला’ हे गाणं लग्नसोहळा, वराती आणि हळदीमध्ये धमाल करणार आहे.