बिग बॉस 17 च्या 14 व्या आठवड्यात ग्रँड फिनालेच्या आधी आयेशा खानला केले घराबाहेर

ग्रँड फिनालेच्या आधी, अंकिता लोखंडे, ईशा मालवीय, आयेशा खान आणि विकी जैन यांना एलिमिनेशनसाठी नामांकन देण्यात आले आहे.

    बिग बॉस 17 : सध्या टेलिव्हिजन वरचा वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस १७ सध्या प्रचंड चर्चेत आहेत. या बिग बॉस १७ चा हा सीजन लवकरच संपणार आहे. ग्रँड फिनालेच्या आधी, अंकिता लोखंडे, ईशा मालवीय, आयेशा खान आणि विकी जैन यांना एलिमिनेशनसाठी नामांकन देण्यात आले आहे. त्याचबरोबर बिग बॉस च्या घरात काही बिग बॉस पाहणाऱ्या प्रेक्षकांना आतमध्ये जाण्याची संधी देण्यात आली होती. या दरम्यान स्पर्धकांना स्टॅन्डअप कॉमेडी करण्याची संधी देण्यात आली होती. यावेळी प्रेक्षकांकडून लाईव्ह वोटिंग करायला सांगितले. ताज्या अहवालानुसार आयशा खानला थेट प्रेक्षकांच्या मतांद्वारे घरातून बाहेर काढण्यात आले आहे.

    सौम्य बाचाबाचीपासून ते शारिरीक रीत्या वादापर्यंत, हे सगळं प्रेक्षकांनी घरात पाहिलं आहे. बिग बॉस 17 च्या मागील एपिसोडमध्ये दोन टीममध्ये विभागलेल्या घरातील सदस्यांना टॉर्चर टास्क देण्यात आला होता. टास्कमध्ये, त्यांना बेदखल होण्यापासून वाचवण्यासाठी विरुद्धच्या टीमचा छळ करावा लागला. मात्र, टीम विक्कीने त्यांच्यावर अत्याचार करण्यासाठी टीम मुनावरला लागणाऱ्या बादल्यांसह सर्व जीवनावश्यक वस्तू लपवून ठेवल्या. त्यामुळे विकी आणि मुनावर यांच्यात शारीरिक बाचाबाची झाली. या कृतीनंतर, टीम विकीच्या सर्व सदस्यांना थेट टीम मुनावरने एलिमिनेशनसाठी नामांकित केले.

    बिग बॉस 17 एलिमिनेशन –
    ग्रँड फिनाले आठवड्यापूर्वी शोमध्ये 8 स्पर्धक घरात आहेत. या स्पर्धकांमध्ये मुनावर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी, ईशा मालवीय, आयशा खान, विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांचा समावेश आहे. दरम्यान, ताज्या अहवालात असे सूचित होते की वाइल्ड कार्ड स्पर्धक आयशा खानला रोस्टिंग टास्क दरम्यान थेट प्रेक्षकांच्या मतांद्वारे घरातून बाहेर काढण्यात आले आहे. परिणामी, आयशा खानला तिच्या विरोधात जास्तीत जास्त मते मिळाली आणि तिला घरातून बाहेर काढावे लागले. शिवाय, विविध अहवालांनी असेही सूचित केले आहे की ग्रँड फिनालेपूर्वी दुसऱ्यांदा एलिमिनेशन करण्यात येईल, ज्यामध्ये विकी, ईशा किंवा अंकिता हे तीन स्पर्धक अजूनही नॉमिनेट आहेत.