आयुष शर्मा-शक्ती मोहन यांचा ‘चुम्मा चुम्मा’ म्युझिक अल्बम रिलीज, काही तासांतच मिळाले लाखो व्ह्यूज

हिट्झ म्युझिकचं नवीन चुम्मा चुम्मा गाणं रिलीज झालयं . विनोद भानुशाली निर्मित, या देसी डान्स ट्रॅकमध्ये अभिनेता आयुष शर्मा आणि शक्ती मोहन आहेत.

    हिट्झ म्युझिकचं नवीन चुम्मा चुम्मा गाणं रिलीज झालयं . विनोद भानुशाली निर्मित, या देसी डान्स ट्रॅकमध्ये अभिनेता आयुष शर्मा आणि शक्ती मोहन आहेत. हे गाणं लोकांना नक्कीच नाचायला लावेल. चुम्मा चुम्मा हे गाणं अमोल-अभिषेक यांनी संगीतबद्ध केलंय आणि अभिषेक टॅलेंटेडने लिहिलंय. राम लीला, राउडी राठोड, आर राजकुमार यांसारख्या चित्रपटांतील गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन करणारे कोरिओग्राफर विष्णुदेव यांनी या गाण्याचं दिग्दर्शन आणि नृत्यदिग्दर्शन केलंय. चुम्मा चुम्मा या गाण्यात त्यांची सिग्नेचर स्टाइल आणि फ्लेवर पाहायला मिळणारे.

    विनोद भानुशाली म्हणतात, “जेव्हा मी चुम्मा चुम्मा हे गाणं ऐकलं तेव्हा माझे पाय थरथरू लागले. या गाण्यासाठी ड्रीम टीमसोबत काम करायला मिळणं हे आमचं भाग्य आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. नकाश आणि नीती यांच्या आवाजाने या गाण्यात जीव आलायं. आयुष शर्मा, शक्ती मोहन यांच्यासोबत विष्णुदेवाच्या देसी मूव्ह्स चुम्मा चुम्माला जीवदान देतात.”

    आयुष शर्मा म्हणतो, “हे गाणं खूप मनोरंजक आहे कारण मला या प्रकारावर नृत्य करायला आवडतं. जरी मी वैयक्तिकरित्या डान्स ट्रॅकचा खूप आनंद घेत असलो तरी मी ते करू शकेन की नाही याची मला भीती वाटत होती, परंतु विष्णू सरांनी मला प्रोत्साहन दिले. मी नेहमीच मोठ्या प्रमाणावर तयार होत असलेल्या डान्स ट्रॅकचं कौतुक केलंय आणि शेवटी त्याचा एक भाग होण्यासाठी खूप उत्सुक होतो. मला शक्तीसोबत डान्स करायला खूप भीती वाटत होती कारण तिच्या डान्सिंग कॅलिबरची जुळवाजुळव करणे खूप अवघड आहे पण विष्णू सर आणि शक्ती या दोघांनी मला शूटिंग दरम्यान खूप मदत केली आणि संयम राखला. विनोद सरांसोबत काम करण्यासाठी मी नेहमीच उत्सुक होतो आणि यासाठी एकत्र काम करण्याची चुम्मा चुम्मा ही उत्तम संधी होती. आता प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी उत्सुक आहे.”