‘संपूर्ण बॉलिवूड भाड्यावर आहे’, अभिनेता आयुष्मान खुरानाने असं का म्हण्टलं?..

अभिनेता आयुष्मान खुराना याने अलीकडेच बॉलिवूड स्टार्सच्या पेहरावाबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. यादरम्यान त्याने त्याचा भाऊ अपारशक्ती खुराणा यांच्याशी संबंधित एक किस्साही शेअर केला.

  बॉलिवूड स्टार्स त्यांच्या लूकबाबत खूप गंभीर असतात. ते त्यांच्या मेकअपची आणि ड्रेसची विशेष काळजी घेतात. आकर्षक दिसण्यासाठी ते नेहमी काहीतरी नवीन करत राहतात. बहुतेक अभिनेते किंवा अभिनेत्री एकदा परिधान केलेले कपडे पुन्हा परिधान करत नाहीत. काही स्टार अपवाद असतीलही. मात्र, अलीकडेच एका मुलाखतीत अभिनेता आयुष्मान खुरानाने (Ayushmann Khurrana) बॉलिवूडमध्ये कपडे भाड्याने घेण्याच्या ट्रेंडबद्दल सांगितले. आयुष्मान खुरानाने बॉलिवूड स्टार्सच्या कपड्यांबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने सांगितले की हे. खुले रहस्य आहे. बहुतेक बॉलीवूड सेलिब्रिटी ट्रेंडमध्ये राहण्यासाठी कपडे विकत घेण्याऐवजी भाड्याने घेतात.

  संपूर्ण बॉलीवूड भाड्याने आहे

  मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॅालिवूडमधील भाड्याच्या कपड्याच्या ट्रेंडबद्दल बोलताना आयुष्मान म्हणाला की, ‘संपूर्ण बॉलिवूड भाड्यावर आहे. आम्ही कपडे खरेदी करतो असे तुम्हाला वाटते? आम्ही स्टायलिस्ट ठेवतो, त्यांच्याकडून कपडे घेतो आणि त्यांना परत करतो. इतके कपडे कुठून आणणार?

  आयुष्मानला दिलजीत दोसांझची स्टाइल आवडते

  दिलजीत दोसांझच्या स्टाईलचे आणि त्याच्या जागतिक पोहोचाचे कौतुक करताना आयुष्मान म्हणाला की, ‘मला दिलजीत दोसांझची शैली आवडते. मी पंजाबसाठी खूष आहे, दिलजीतने त्याला जागतिक स्तरावर नेले आहे. ते खूप चांगले आहे’.

  आयुष्मानचं वर्क फ्रंट

  आयुष्मान शेवटचा ‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये दिसला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र, अद्याप आयुष्माने त्याच्या नव्या कामाबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही.