अक्षय कुमार की अजय देवगण! जाणून घ्या कुणी गाजवलं बॅाक्स ऑफिसचं ‘मैदान’

अजय देवगणच्या मैदान आणि अक्षय कुमारचा बडे मियाँ छोटे मियाँ हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. आता या दोन्ही चित्रपट बॅाक्स ऑफिसवर काय कमाल करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

  या आठवड्यात दोन मोठे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. प्रेक्षकांना एकत्र दोन नवीन चित्रपट भेट दिले आहेत. मात्र, तो रिलीज होताच दोघांमध्ये चुरस सुरू झाली आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chote Miyan ) या चित्रपटाची चाहत्यांमध्ये खूप क्रेझ होती. दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता त्यांचे चाहते सोशल मीडियावर चित्रपटाचे रिव्ह्यू शेअर करत आहेत. त्याचबरोबर अनेक बडे सेलिब्रिटी देखील अजय देवगणच्या मैदानाचे (Maidaan) कौतुक करत आहेत. चला तर मग जाणून घेऊया शुक्रवारी कोणत्या चित्रपटानं बॅाक्स ऑफिसवर काय कमाल केली.

  बडे मियाँ छोटे मियाँ

  दिग्दर्शक अली अब्बास जफर यांचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा एक ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर सातत्याने खळबळ उडाली आहे. नेहमीप्रमाणेच या चित्रपटातील अक्षयचा अभिनय प्रेक्षकांना आवडला आहे. या चित्रपटात अक्षय कुमारने पहिल्यांदाच टायगर श्रॉफसोबत स्क्रीन स्पेस शेअर केली आहे.
  बडे मियाँ छोटे मियाँच्या कलेक्शनबद्दल सांगायचे तर, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ३.९५ कोटींची कमाई केली असून, चित्रपटाने आतापर्यंत १९.६ कोटींची कमाई केली आहे. मात्र, चित्रपटाचे कलेक्शन पाहता हा चित्रपट विकेंडमध्ये चांगले कलेक्शन करू शकेल, असा अंदाज आहे.

  मैदान

  अजय देवगणचा ‘मैदान’ हा एक स्पोर्ट्स ड्रामा बायोपिक आहे ज्यात फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांचा प्रवास दाखवला आहे. ‘मैदान’ चित्रपटात अभिनेता अजय देवगणने फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे. ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात फारसा यशस्वी ठरला नाही. मैदानाने दुसऱ्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 1.87 कोटी रुपयांची कमाई केली असून, आतापर्यंत चित्रपटाचे एकूण कलेक्शन 8.97 कोटी रुपये झाले आहे.

  क्रू

  29 मार्च रोजी रिलीज झालेला ‘क्रू’ हा चित्रपट राजेश ए कृष्णन यांनी दिग्दर्शित केला आहे. तब्बू, करीना कपूर खान आणि क्रिती सेनॉन यांचा अभिनय लोकांच्या हृदयाला भिडण्यात यशस्वी ठरला आहे. क्रूने 15 व्या दिवशी 68 लाखांची कमाई केली आहे, चित्रपटाने आतापर्यंत 64.85 लाख रुपये कमवले आहेत.