‘बडे मियाँ छोटे मियाँ’ जगभरात डंका, लवकरच 100 कोटी क्लबमध्ये सामिल होणार!

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या चित्रपटानेही देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 15.65 कोटींचा व्यवसाय केला.

  अक्षय कुमारने पहिल्यांदाच टायगर श्रॉफचा ॲक्शन ड्रामा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chote Miyan ) चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत. खिलाडीकुमारचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पंसतीस पडला आहे. फॅन्ससह सेलिब्रिटीही चित्रपटाचं कौतुक करताना दिसत आहे. नेहमीप्रमाणेच या चित्रपटातील अक्षयचा अभिनय प्रेक्षकांना आवडला आहे. या चित्रपटात  अप्रतिम ॲक्शन दृश्यांनी भरलेला हा चित्रपट केवळ भारतीय प्रेक्षकांनाच आवडत नाही तर चित्रपटाने परदेशी प्रेक्षकांनाही भुरळ घातलेली दिसत आहे. चित्रपटाचा जगभरातील बॉक्स ऑफिस व्यवसाय याची साक्ष देतो.

  ‘बडे मियाँ छोटे मियाँची बॅाक्स ऑफिसवर कमाई

  ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ने रिलीजच्या तीन दिवसांतच जगभरात यश मिळवले आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ सर्व वयोगटातील प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत करत आहे. तिसऱ्या दिवशी एकूण 76.01 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करणे सुरूच ठेवले आहे.

  बडे मियाँ छोटे मियाँची कमाई पाहता हा चित्रपट लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल असे वाटते. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या चित्रपटानेही देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 15.65 कोटींचा व्यवसाय केला. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 7.06 कोटींची कमाई केली. अशा प्रकारे चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत २३.२८ कोटींची कमाई केली. मात्र, तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत आणखी एक झेप पाहायला मिळाली. चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 5.55 कोटींची कमाई केली असून, चित्रपटाने आतापर्यंत 28.8 कोटींची कमाई केली आहे.

  चित्रपटाची स्टारकास्ट

  अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्याशिवाय या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, मानुषी छिल्लर, अलाया एफ, सोनाक्षी सिन्हा आणि रोनित रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अक्षय कुमार आणि टायगर दोघेही इंडस्ट्रीत त्यांच्या ॲक्शन आणि स्टंटसाठी प्रसिद्ध आहेत. आता दोघेही एकाच चित्रपटात एकत्र दिसल्याने बॉक्स ऑफिसवर नक्कीच काही नवे रेकॉर्ड बनतील अशी अपेक्षा आहे.