यश-अपयशाचे उत्तम समीकरण ‘बेफाम’,लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अपयश ही यशाची पहिली पायरी असते, त्यामुळे यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी अपयशाच्या बऱ्याच पायऱ्या ओलांडाव्या लागतात मात्र अशावेळी खचून न जाता पुन्हा उठून यशाकडचा प्रवास नव्याने सुरू करणारा प्रत्येक व्यक्ती यशाच्या दारात पोहोचतोच. या साऱ्या प्रवासात मात्र तो प्रत्येक पायरीवर एक नवी शिकवण शिकत पुढे जात असतो . यशाचे आणि अपयशाचे उत्तम समीकरण साधणारा नवाकोरा 'बेफाम' हा चित्रपट लवकरच 'अमोल कागणे प्रोडक्शन'द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे उत्कंठा वाढविणारे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

अपयश ही यशाची पहिली पायरी असते, त्यामुळे यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी अपयशाच्या बऱ्याच पायऱ्या ओलांडाव्या लागतात मात्र अशावेळी खचून न जाता पुन्हा उठून यशाकडचा प्रवास नव्याने सुरू करणारा प्रत्येक व्यक्ती यशाच्या दारात पोहोचतोच. या साऱ्या प्रवासात मात्र तो प्रत्येक पायरीवर एक नवी शिकवण शिकत पुढे जात असतो . यशाचे आणि अपयशाचे उत्तम समीकरण साधणारा नवाकोरा ‘बेफाम’ हा चित्रपट लवकरच ‘अमोल कागणे प्रोडक्शन’द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे उत्कंठा वाढविणारे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

befam

अमोल कागणे स्टुडिओझ प्रस्तुत, निर्माता अमोल लक्ष्मण कागणे निर्मित हा चित्रपट दिग्दर्शक कृष्णा कांबळे यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘हलाल’, ‘लेथ जोशी’, ‘परफ्युम’, ‘वाजवूया बँड बाजा’ या चित्रपटांच्या निर्मिती नंतर अमोलचा ‘बेफाम’ हा नव्या दमाचा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करेल यांत शंकाच नाही. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण एकनाथराव कागणे आणि अभिनेत्री प्रीतम लक्ष्मण कागणे प्रस्तुत हा चित्रपट असून लेखक विद्यासागर अद्यापक लिखित या चित्रपटाची कथा आहे. गायक अमित राज, मंदार खरे यांच्या सुमधुर स्वरात चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत, तर गायक क्षितिज पटवर्धन यांच्या संगीत लहरींवर या चित्रपटातील गाण्यांनी चारचाँद लावले आहेत. संकलन राजेश राव आणि कलानिर्माता मिथिलेश सिंग राजपुत तर प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून अजय सोनी आणि वितरक म्हणून ‘पिकल एंटरटेनमेंट’ अशी इतर श्रेयनामावली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात नेमके कोणते कलाकार झळकणार हे अजूनही गुलदस्यात ठेवण्यात आले आहे. आणि चित्रपटाचे पोस्टर पाहता चित्रपटात कोणते कलाकार दिसणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

उभ्या ठाकलेल्या संकटांना निडरपणे तोंड देणे ही उत्तम शिकवण देणारा आणि अपयश पचवून यशाच्या वाटेवर चालत आपले आयुष्य सुखकर करणारा असा बेफाम सकारात्मक ऊर्जा देणारा हा ‘बेफाम’ चित्रपट प्रेक्षकांची उत्कंठा वाढवण्यास सज्ज झाला आहे. शिवाय या चित्रपटाचे पाठमोरे पोस्टर पाहता अजूनच उत्सुकता मनात निर्माण झाली असून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस केव्हा येतो याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.