एकीकडे मेकअप तर दुसरीकडे बाळासाठी ब्रेस्ट पंपिंग, अभिनेत्री करतेय तारेवरची कसरत!

सध्या गल गडोटने सोशल मीडियावर शेअर केलेले दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये ती ब्रेस्ट मिल्क पंप करताना दिसतेय.

  हॉलिवूड अभिनेत्री गल गडोट नुकतीच तिसऱ्यांदा आई झाली आहे. तिने एका गोड मुलीला जन्म दिलाय. गल गडोट नेहमीच तिच्या बोल्ड स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. गल गडोट मुलीच्या जन्मानंतर काही महिन्यात लगेचच कामावर परतली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Gal Gadot (@gal_gadot)

   

  सध्या गल गडोटने सोशल मीडियावर शेअर केलेले दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये ती ब्रेस्ट मिल्क पंप करताना दिसतेय. ती बाथरोबमध्ये एका खुर्चीवर बसलेली आहे, यावेळी मेकअपमन मेकअप करत आहेत तर दुसरीकडे ती बाळासाठी पंपिगने दूध काढत आहे. हा फोटो शेअर करत गल गडोटने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “बॅकस्टेजच्या मागे, एक आई आहे”

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Gal Gadot (@gal_gadot)

  कामावर आल्यावरही ती आपल्या बाळाची काळजी घेतेय असं या फोटोतून स्पष्ट होतय. ती आपल्या बाळाच्या दूधाची सोयही करतेय तर दुसरकडे तयारही होतेय. जून महिन्यातच गल गडोट तिसऱ्यांदा आई झाली आहे. या आधी तिला आलमा ही नऊ वर्षांची तर माया ही चार वर्षांची मुलगी आहे.