‘भाभी जी घर पर है’ फेम अभिनेत्याच्या मुलाचे निधन, 19 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'भाभी जी घर पर हैं' या लोकप्रिय टीव्ही शोचा अभिनेता जीतू गुप्ता यांच्या मुलाचे निधन झाले आहे.

    अभिनेत्याला आयुष नावाचा मुलगा होता, तो फक्त 19 वर्षांचा होता. आपल्या धाकट्या मुलाच्या मृत्यूने जीतूला खूप मोठा धक्का बसला आहे. खुद्द जितू गुप्ताने आपल्या फेसबुक अकाऊंटवर आपल्या मुलाचा फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना त्याच्या मृत्यूची माहिती दिली आहे. यानंतर कॉमेडियन सुनील पाल यांनी जीतू गुप्ता यांच्या मुलाच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सुनील पाल यांनी पोस्टला कॅप्शन दिले- ‘RIP, भाभी जी घर पर है अभिनेता, माझा भाऊ जीतूचा मुलगा आयुष (19 वर्ष) राहिला नाही.’

    आपल्या मुलाच्या मृत्यूच्या एक दिवस आधी अभिनेता जीतू गुप्ता यांनी एक फोटो पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. या फोटोमध्ये आयुष हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला दिसत होता. आयुषचा हा फोटो शेअर करताना जीतूने आपल्या मुलाची प्रकृती चिंताजनक असून तो कोणाशीही बोलण्याच्या स्थितीत नसल्याचे सांगितले होते.

    जीतू गुप्ता ‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेत डॉक्टरच्या भूमिकेत दिसला होता. या शोमधून त्याला विशेष ओळख आणि नाव मिळाले. ‘भाभी जी घर पर हैं’ ही मालिका त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता, असे त्याने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते.