भाभी जी घर पर है ‘या’ प्रसिद्ध कलाकाराचं वयाच्या 13 व्या वर्षी शारीरिक शोषण, इतक्या वर्षांनंतर धक्कादायक खुलासा

अभिनेता सानंद वर्माने धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने सांगितले की वयाच्या 13 व्या वर्षी त्याचे शारीरिक शोषण झाले होते. याला त्यांनी अविस्मरणीय वेदना म्हटले.

  भाभी जी घर पर है’ (Bhabhi Ji Ghar Par Hai) ही टीव्हीवरील एक लोकप्रिय मालिका आहे. कार्यक्रमातील प्रत्येक पात्रानं प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलंय. यामध्ये विभूती नारायणपासून अंगूरी भाभीपर्यंत अनेक नावांचा समावेश आहे. आता ‘भाभी जी घर पर है’च्या एका कलाकाराने सानंद वर्मा अचानक चर्चेत आला आहे. सानंदने एका मुलाखती दरम्यान धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने सांगितले की वयाच्या 13 व्या वर्षी त्याचं शारीरिक शोषण झालं होतं.

  अनेक वर्षांनंतर खुलासा

  सानंद वर्माने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जेव्हा तो १३ वर्षांचे होता, तेव्हा त्यांच शारीरिक शोषण झालं होतं. तो म्हणाला की, लहानपणी तो क्रिकेट खेळायला जायचा, तिथे एका व्यक्तीनं त्याचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला. सानंदनं याला एक भयानक आणि अविस्मरणीय स्मृती म्हटलं.

  पुढे बोलताना सानंद म्हणाला की, “माझ्यासोबत एकदा क्रिकेट सामन्यादरम्यान असं घडलं. मी 13 वर्षांचा होतो तेव्हा मला क्रिकेटर बनायचे होते. मी बिहारच्या पाटणा येथील क्रिकेट प्रशिक्षण अकादमीमध्ये गेलो होतो. तेथे एका व्यक्तीने माझं शोषण केलं. तेव्हा मी खूप घाबरलो आणि पळून गेलो. तेव्हापासून मी क्रिकेटपासून दूर राहिलो.”

  वेदना कधीही विसरू शकत नाही

  ‘भाभी जी घर पर है’ या अभिनेत्याने पुढे सांगितले की, या घटनेने त्याच्या मनावर खोल ठसा उमटवला, ज्यामुळे तो एक व्यक्ती म्हणून अधिक मजबूत झाला. ते म्हणाले, “लहानपणी माझ्यासोबत जे काही घडलं ते निश्चितच एक भयंकर स्मृती आहे, याआधीही माझ्यासोबत अनेक भयंकर गोष्टी घडल्या आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती एवढ्या त्रासातून जाते, तेव्हा त्याला इतर कोणत्याही वेदनांचा फरक पडत नाही.”