‘मिसळीबरोबर पाव खायचा की ब्रेड’ सोशल मीडियावर रंगलं युद्ध, Bhadipa ने शेअर केला VIDEO!

असा हा मजेशीर व्हिडीओ करण्यात आला आहे. कोणीही विचारसुद्धा केला नसेल की बाहुबलीच्या त्या गंभीर दृश्यावर असं काही करता येऊ शकतं. असा आगळावेगळा प्रयोग केला आहे रांगड्या कोल्हापूरच्या सुमित पाटील यानं.

  मिसळ हा तमाम मराठी लोकांचा वीक पॉइंट. पण कुठली मिसळ बेस्ट यावर कुठेही, कधीही, कुणाबरोबरही वाद घालू शकतात. प्रत्येकाला आपापल्या गावची स्पेशल मिसळ जगात भारी वाटते हे खरं. पण सध्या सोशल मीडियावर मिसळीबाबतचा वेगळाच वाद सुरू आहे. मिसळीबरोबर पाव खायचा की ब्रेड स्लाइस? आता या वादावरून चक्क युद्ध होणार आहे, तेही बाहुबलीच्या माहिश्मतीमध्ये..भाडिप- अर्थात भारतीय डिजिटल पार्टीने टाकलेल्या एका भन्नाट VIDEO ची चर्चा जोरात आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Bharatiya Digital Party (@bhadipa)

  सोशल मीडियावर बाहुबली मधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र त्या पात्रांच्या तोंडात इतके मजेशीर संवाद बसविण्यात आले आहेत. की ते ऐकून तुम्हीसुद्धा पोट धरून हसायला लागाल. या व्हिडीओ मध्ये बाहुबलीच्या कलाकारांमध्ये मिसळ साठी युद्ध चालू असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

  असा हा मजेशीर व्हिडीओ करण्यात आला आहे. कोणीही विचारसुद्धा केला नसेल की बाहुबलीच्या त्या गंभीर दृश्यावर असं काही करता येऊ शकतं. असा आगळावेगळा प्रयोग केला आहे रांगड्या कोल्हापूरच्या सुमित पाटील यानं. याआधीही सुमितने अनेक चित्रपटांच्या दृश्यांवर असे मिम्स केले आहेत. तसेच त्याचे प्रत्येक व्हिडिओ सर्वांना पोट धरून हसायला भाग पाडतात.