bharat jadhav

अभिनय क्षेत्रात सुरुवातीला मोठा संघर्ष करावा लागतो.(Misuse Of Bharat Jadhav`s Name) मात्र हे सगळं करत असताना अनेकांची फसवणूक(Fraud) केली जाते. असाच एक प्रकार मराठी अभिनेता भरत जाधवने(Bharat Jadhav Exposed Fraud) नुकताच उघडकीस आणला आहे.

  अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक तरुण तरुणी धडपड करत असतात. अभिनय क्षेत्रात सुरुवातीला मोठा संघर्ष करावा लागतो.(Misuse Of Bharat Jadhav`s Name) मात्र हे सगळं करत असताना अनेकांची फसवणूक(Fraud) केली जाते. असाच एक प्रकार मराठी अभिनेता भरत जाधवने(Bharat Jadhav Exposed Fraud) नुकताच उघडकीस आणला आहे.

  भरत जाधव यांच्या सिमेनात काम देण्याचं आमिष दाखवून काही एजंट अनेकांची फसवणूक करत होते. या तरुण-तरुणींना भरत जाधवच्या सिनेमासाठी सिलेक्शन झाल्याचं सांगत त्यांच्याकडून १५ हजारांची रक्कम घेतली जात होती. मात्र या सर्व गोष्टी खोट्या असल्याचं सांगत भरत जाधव यांनी फसवणूक करणाऱ्यांपासून अनेकांना सावध केलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भरत जाधवने हा सगळा प्रकार स्पष्ट केला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

  “काल एका व्यक्तीचा मेसेज आला की, “तुमच्या सिनेमात काम करण्यासाठी मुंबईतील एका एजंटने आमची ऑडिशन घेतली व सिलेक्शन झाले असून फोटोशूट व पुढील प्रोसेसिंग फी च्या नावाखाली १५०००/- रुपयांची मागणी केली.” मी सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या कोणत्याही सिनेमाचं असं कुठेही ऑडिशन सुरू नाहीए. जर कोणी माझ्या नावाचा गैरवापर करून किंवा माझ्या सोबतचा एखादा फोटो दाखवून सिनेमात काम मिळवून देतो असे आश्वासन देत असेल तर अशा भूलथापांना बळी पडू नका. कोणालाही पैसे देऊ नका. संबंधित व्यक्तींवर लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई होईल.” ही पोस्ट शेअर करत भरत जाधव यांनी लोकांना सावध केलं आहे.