बिग बी पडले मराठी चित्रपटाच्या प्रेमात, सोशल मीडियावर शेअर केला आगामी मराठी चित्रपटाचा Video!

अमिताभ बच्चन यांनी 'सात बाई सात…बायका सात! जिवाची सफर…आता राणीच्या देशात!' असे टि्वट केले होते. बिग-बी अमिताभ बच्चन यांनी टि्वट केल्याबद्दल सर्व कलाकारानी बिग-बी चे आभार व्यक्त केले आहे.

    महिला दिनाचे औचित्यासाधून दिग्दर्शक व लेखक हेमंत ढोमे यांच्या नव्या कोऱ्या ‘झिम्मा’ या मराठी चित्रपटाचा टिझर शेअर केला आहे. या टीझरचं सर्वत्र कौतुक होत आहे. हा टीझर बघून बिग बींनाही तो शेअर करण्याचा मोह आवरला नाही. महानायक अमिताभ बच्चन यांनी झिम्मा चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे.

     

    अमिताभ बच्चन यांनी ‘सात बाई सात…बायका सात! जिवाची सफर…आता राणीच्या देशात!’ असे टि्वट केले होते. बिग-बी अमिताभ बच्चन यांनी टि्वट केल्याबद्दल सर्व कलाकारानी बिग-बी चे आभार व्यक्त केले आहे. बिग-बी सोबतच बॉलीवुडचा आघाडीचा गायक मिका सिंगनेही ‘झिम्मा’ या चित्रपटाचा टिझर टि्वट केला आहे. हा चित्रपट येत्या २३ एप्रिल रोजी प्रदर्शीत होणार आहे.

    कोरोना प्रादुर्भावानंतर तगडी स्टारकास्ट घेउन लेखक व दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी आपल्या ‘झिम्मा’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘झिम्मा’ या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टितील सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले, सुचित्रा बादेंकर आणि निर्मीती सांवत यासारखी तगडी स्टारकास्ट आहे. मनसे नेते अमेय खोपकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.