रूपालीचा रॉयल कारभार, सोशल मीडियावर शेअर केलेल्या लूक ती चर्चेत, लाल रंगात आणखी खुललं तीचं सौंदर्य!

स्वप्नांच्या पलीकडले', 'शेजारी शेजारी पक्के शेजारी', 'महासंग्राम', 'दिल्या घरी तू सुखी राहा' या मालिकांमधून तिने आपले अभिनय गुण दाखवून दिले. रुपाली भोसलेने मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

    ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सिझनमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली स्पर्धक रुपाली भोसले. ही चर्चेत आहे. या चर्चा तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे सुरु झाल्या आहेत. रुपालीने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये रुपालीने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला असल्याचे दिसत आहे. त्यावर तिने सिंपल अशी ज्वेलरी परिधान केली आहे.  या लूकमध्ये रुपाली अतिशय सुंदर दिसत आहे.

    रुपाली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती, ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत संजना ही भूमिका साकारत आहे. ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘दोन किनारे दोघी आपण’, ‘कन्यादान’ या मालिकांमध्ये रुपालीने काम केले आहे. ‘

    स्वप्नांच्या पलीकडले’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘महासंग्राम’, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’ या मालिकांमधून तिने आपले अभिनय गुण दाखवून दिले. रुपाली भोसलेने मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. ‘आयुषमान भव’, ‘कसमे वादे’, ‘बडी दूर से आये हैं’, ‘तेनाली रामा’ या हिंदी मालिकांमध्ये रुपालीने काम केले आहे. तिच्या या खास फोटोशूटला सोशल मीडियावर चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.