RRR Movie poster

या चित्रपटाचं शूटिंग हैदराबादमध्ये करण्यात आलं आहे. प्रेक्षकांना त्या युगात नेण्यासाठी तिथं भव्य सेट उभारण्यात आला होता. राजामौली आणि टीमनं चित्रपटाचा पूर्ण टॅाकी पोर्शन पूर्ण केला आहे.

    ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजामौली मागील बऱ्याच दिवसांपासून ‘आरआरआर’ या आपल्या आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टवर काम करत आहेत. लॅाकडाऊन आणि कोरोनाच्या सावटामुळं इतर चित्रपटांप्रमाणे या चित्रपटाचं कामही रखडलं होतं, पण आता ‘आरआरआर’चं काम वेगात सुरू आहे. देशातील हा सर्वात मोठा मल्टीस्टारर चित्रपट असलेला ‘आरआरआर’ वेगात पूर्णत्वाच्या दिशेनं वाटचाल करत आहे. प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक कोमाराम भीम आणि अल्लूरी सीताराम राजू यांच्या जीवनावर आधारीत असलेली काल्पनिक कथा यात आहे.

    या चित्रपटाचं शूटिंग हैदराबादमध्ये करण्यात आलं आहे. प्रेक्षकांना त्या युगात नेण्यासाठी तिथं भव्य सेट उभारण्यात आला होता. राजामौली आणि टीमनं चित्रपटाचा पूर्ण टॅाकी पोर्शन पूर्ण केला आहे. या चित्रपटातील दोन गाणी शूट करायची बाकी आहेत. या गाण्यांच्या चित्रीकरणानंतर ‘आरआरआर’चं शूट पूर्ण होणार आहे.

    चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू करण्यात आलं आहे. मुख्य भूमिकेत असलेल्या ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी तेलुगू आणि तमिळ भाषेतील डबिंगही पूर्ण केलं आहे. लवकरच ते इतर भाषांमधील डबिंगही संपवणार आहेत. ४५० कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटात आलिया भट्ट, अजय देवगण आणि ओलिविया मॉरिससह आणखीही काही कलाकार आहेत. ‘आरआरआर’ १३ आॅक्टोबरला रिलीज होणार आहे.