
मुंबई : आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी चाहते कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार असतात. बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) याची लोकप्रियता संपूर्ण जगभरात आहेत. दरवर्षी २७ डिसेंबर सलमान खानच्या वाढदिवशी चाहते अनेक कारनामे करून आपल्या आवडत्या कलाकाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. सध्या सोशल मीडियावर भाईजानचा एक चाहता चर्चेत आहे. समीर नामक या चाहता सलमानला भेटण्यासाठी सायकलने जबलपूरवरुन (Jabalpur) मुंबईला निघाला आहे.
भारत के सबसे बड़े और विश्व के पहले #SalmanKhan फैन्स क्लब जबलपुर (@beingsansthaskf ) से हमारा एक साथी #jabalpur_city से #mumbai साइकिल यात्रा कर @BeingSalmanKhan
से मिलने निकला। pic.twitter.com/CVrbcjVT3X— prabhat barman (@prabhatbarmansk) December 23, 2022
सलमानचा जबरा फॅन असणाऱ्या समीरला सलमानला भेटून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. समीर गुरुवारी जबलपूरवरुन सायकलवर मुंबईला रवाना झाला आहे. प्रवास सुखकर करता यावा यासाठी त्याने सायकलला खास बॅटरी लावली आहे. समीरला अवघ्या पाच दिवसांत 1100 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. आता थंडीला सुरुवात झाल्याने त्याचा हा प्रवास खूपच आव्हानात्मक आहे. मात्र तो भाईजानचा जबरा फॅन असल्यामुळे त्याला भेटूनच सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्याने चार वर्षांपूर्वी पापण्यांवर सलमान खानचे नाव लिहिले आहे. तसेच त्याने त्याच्या हातावर सलमानच्या नावाचा खास टॅटूही बनवला आहे.