rubina dilaik

अभिनेत्री रुबीना दिलैकला (Rubina Dilaik) पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली. मागच्या वर्षी मे महिन्यातही रुबीनाला कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी तिची तब्येत बरीच ढासळली होती आणि आता ८ महिन्यानंतर पुन्हा एकदा रुबीनाला कोरोनाची (Rubina Dilaik Tested Corona Positive) लागण झाली आहे.

  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे (Corona Third Wave) देशभरामध्ये खूप विचित्र वातावरण आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेत बिग बॉस १४ ची विजेती आणि टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैकला (Rubina Dilaik) पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली. मागच्या वर्षी मे महिन्यातही रुबीनाला कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी तिची तब्येत बरीच ढासळली होती आणि आता ८ महिन्यानंतर पुन्हा एकदा रुबीनाला कोरोनाची (Rubina Dilaik Tested Corona Positive) लागण झाली आहे. सोशल मीडियावरून रुबीनाने याविषयी माहिती दिली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

  रुबीनानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. आता रुबीनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ती ठीक असल्याचंही तिनं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. इन्स्टाग्रामवर काही स्टनिंग फोटो शेअर करत काही दिवसांपूर्वीच आपल्या पुन्हा एकदा कोरोनाचं संक्रमण झालं होतं असं रुबीनानं सांगितलं आहे.

  इन्स्टाग्रामवर ग्लॅमरस आणि स्टनिंग फोटो शेअर करताना रुबीनानं लिहिलं, ‘ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं माझ्या आरोग्यावर दुसऱ्यांदा आघात केला असला तरीही कोरोना अद्याप माझी हिंमत तोडू शकलेला नाही. त्यामुळेच मी आता माझं छोटं छोटं यश देखील सेलिब्रेट करते. यामुळे माझं आयुष्य आणखी सुंदर होतं. आता मी पूर्णपणे ठीक झाले आहे.’