abdu rozik and salman khan(1)

ताजिकिस्तानमध्ये प्रसिद्धी मिळवलेला अब्दू हा गायक आहे. फक्त १८ वर्षांच्या अब्दूच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत. त्याच्या गाण्यांचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

    यंदाचं ‘बिग बॉस हिंदी’चं (Bigg Boss Hindi) पर्व विविध कारणांमुळे चर्चेत राहिलं. ‘बिग बॉस हिंदी’च्या (Bigg Boss Hindi 16) सोळाव्या पर्वात ताजिकिस्तानचा अब्दू रोजिक (Abdu Rozik) नेहमी चर्चेत असतो. त्याने शोमधून एक्झिट घेतल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला. अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

    ‘बिग बॉस’च्या घरात अब्दूला परत आणण्यात यावं, अशी चाहत्यांची मागणी होती. आता अब्दूने घरात पुन्हा प्रवेश केल्याने चाहते सुखावले आहेत. अब्दूच्या चाहत्यांसाठी आणखी एक गुडन्यूज आहे. लवकरच तो मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खानच्या चित्रपटातूनच अब्दू बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याची बातमी समोर आली आहे.

    मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात अब्दू झळकणार आहे. या चित्रपटात त्याची भूमिका कशी असेल? याचा खुलासा अद्याप झालेला नाही. मात्र सलमान खानबरोबर अब्दूला स्क्रीन शेअर करताना पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.

    ताजिकिस्तानमध्ये प्रसिद्धी मिळवलेला अब्दू हा गायक आहे. फक्त १८ वर्षांच्या अब्दूच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत. त्याच्या गाण्यांचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याने गायलेल्या हिंदी गाण्यांनाही नेटकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.