15 ऑक्टोबरपासून सुरु होणार ‘बिग बॉस 17’, धमाकेदार प्रोमो आऊट, सनमान खान दिसतोय खास अंदाजात!

बिग बॉस 17'मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार हे जाणून घेण्यासाठी बिग बॉसप्रेमी उत्सुक आहेत. अंकिता लोखंडे, ईशा मालवीय, अर्जित तनेजा, ऐश्वर्या शर्मा आणि अरमान मिलिक या स्पर्धकांचा 'बिग बॉस 17'मध्ये समावेश होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

    नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात अडकत असला तरीही लोकप्रिय असलेला छोट्या पडद्यावरील कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस’ (Bigg Boss). लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणारा आहे. अभिनेता भाईजान सलमान खान (Salman Khan) हा कार्यक्रमाचं सूत्र संचालन करणार आहे. या कार्यक्रमाचा नवा धमाकेदार प्रोमो आऊट झाला आहे.
    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॅासचा 17 वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
    ‘बिग बॉस ओटीटी’नंतर आता ‘बिग बॉस 17’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. ‘बिग बॉस 17’चा धमाकेदार प्रोमो आऊट झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ‘बिग बॉस 17’मध्ये प्रेक्षकांना अनेक ट्वीस्ट पाहायला मिळणार आहेत. या सिझनमध्ये कोण काेण कलाकार आहेत याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे.
    ‘बिग बॉस 17’चा प्रोमो आऊट (Bigg Boss 17 Promo Out)
    ‘बिग बॉस 17’ या कार्यक्रमाचा प्रोमो कलर्स टीव्हीने शेअर केला आहे. प्रोमो शेअर करत प्रीमियर डेटदेखील जाहीर करण्यात आली आहे. कलर्स टीव्हीने प्रोमो शेअर करत लिहिलं आहे,”जिसके सीने में हो जिगर, उनको बिग बॉसके औरसे क्या होगी फिकर”.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by ColorsTV (@colorstv)

    ‘बिग बॉस 17’मध्ये ‘हे’ स्पर्धक दिसणार

    ‘बिग बॉस 17’मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार हे जाणून घेण्यासाठी बिग बॉसप्रेमी उत्सुक आहेत. अंकिता लोखंडे, ईशा मालवीय, अर्जित तनेजा, ऐश्वर्या शर्मा आणि अरमान मिलिक या स्पर्धकांचा ‘बिग बॉस 17’मध्ये समावेश होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.