बिग बॉस फेम अब्दू रोजिक अडकणार लग्नबंधनात, जाणून घ्या कोण आहे त्याची होणारी पत्नी!

अब्दूने त्याच्या इन्स्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्या लग्नाची घोषणा केली आहे.

  मुंबई : ‘बिग बॉस 16’ मध्ये दिसलेला प्रसिद्ध गायक अब्दू रोजिक (Abdu Rozik) सध्या त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. अब्दूने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याच्या लग्नाची घोषणा केली आहे. त्याने आपल्या भावी वधूसाठी विकत घेतलेल्या हिऱ्याच्या अंगठीची झलकही दाखवली. अब्दूने लग्नाची ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर करताच सेलेब्रिटिनींपासून ते चाहतेही जगभरातून त्याला शुभेच्छा देत आहे.

  अब्दूने व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

  अब्दू रोजिकने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, माझ्या आयुष्यात कोणी येईल असे मला कधीच वाटले नव्हते. मी खूप भाग्यवान समजतो की मला माझे प्रेम मिळाले आहे, जो माझा आदर करतो आणि माझी काळजी घेतो. तिचे आणि माझे 7 जुलै रोजी लग्न होत आहे आणि मी किती आनंदी आहे हे मी सांगू शकत नाही.

  अब्दूची भावी पत्नी कोण आहे?

  अब्दू रोजिकने त्याच्या भावी वधूबद्दलही खुलासा केला. अब्दु रोजिकची भावी पत्नी शारजाहची आहे. अब्दू रोजिक 19 वर्षांच्या अमीराती मुलीशी लग्न करणार आहे. अब्दू आणि अमीराची पहिली भेट दुबईच्या मॉलमध्ये झाली होती. त्यांनी त्यांची प्रेमकहाणी सगळ्यांपासून लपवुन ठेवली, परंतु अलीकडेच त्यांच्या प्रतिबद्धतेची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Abduroziq Official (@abdu_rozik)

  कोण आहे अब्दू रोजिक

  अब्दू रोजिक हा प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार आणि गायक आहे. टीव्हीवरीव रिॲलिटी शो ‘बिग बॉस’मधून चर्चेत आलेला गायक अब्दू रोजिकने तरुण वयातच करोडोंची संपत्ती कमावली आहे. याशिवाय अब्दू सतत बिग बॉसच्या स्पर्धकांसोबत दिसायला आणि शिव ठाकरेंसह अनेक कलाकारांसोबत सतत दिसायचा.