बिग बॅास फेम अब्दु रोजिकची झाली एंगेजमेंट, छोट्या भाईजानला जगभरातून शुभेच्छा!

बिग बॉसमधून सर्वांची मने जिंकणाऱ्या अब्दू रोजिकने एंगेजमेंट केली आहे. अब्दूने एंगेजमेंटचा फोटो शेअर करत हा खास सोहळा कधी झाला हे सांगितले.

  बिग बॉस फेम अब्दू रोजिकने शुक्रवारी (10 मे) त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याच्या लग्नाची घोषणा केली होती. जगभरातील फॅन्ससह सेलेब्रिटींनी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या. अमीरा नावाच्या मुलीशी लग्न करणार असल्याचं त्यानं सांगितलं होतं. आता त्याने इन्स्टाग्रामवरुन नवे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याची एगेंजमेंट (Abdu Rojik Engagement) झाल्याचं दिसत आहे. हे फोटो समोर आल्यानंतर फॅन्स त्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत.

  रिपोर्ट नुसार अब्दूची  24 एप्रिल रोजी अमीरासोबत एगेंजमेंट झाली असून त्याने या समारंभाचे फोटो आता शेअर केले आहेत. कालच रोजिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत लग्न बंधनात अडकणार असल्याचं सांगितलं होतं. फोटोमध्ये अब्दू त्याच्या भावी वधूला हिऱ्याची अंगठी दाखवताना दिसला. फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये तिच्या एंगेजमेंटची तारीख 24 एप्रिल अशी नमूद केली आहे. आता हे जोडपं जुलैमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Abduroziq Official (@abdu_rozik)

  काय म्हणाला अब्दु रोजिक

  अब्दू रोजिकने 8 मे रोजी त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर लग्नाची घोषणा करून त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. एका हृदयस्पर्शी व्हिडिओद्वारे त्याने आपल्या लग्नाची बातमी शेअर केली. अब्दूने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी माझ्या आयुष्यात कधीच विचार केला नव्हता की मी इतका भाग्यवान आहे की मला असा प्रेम मिळेल जो माझा आदर करेल. ७ जुलैची ही लग्नाची तारीख लक्षात ठेवा!! मी किती आनंदी आहे हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, असं तो म्हणाला होता.