dadus in bigg boss

‘दादुस ऑर्केस्ट्रा –फॅशन शोभेल तुला!’ (Dadus Orchestra In Bigg Boss Marathi 3) या कार्यक्रमात विकास पाटील ‘हृदयी वसंत फुलताना...’ या गाण्यावर मीनल शाहसोबत नृत्य सादर करणार आहे. सुरेखा कुडची यांच्यासोबत उत्कर्ष शिंदे ‘ही पोली साजूक तुपातली...’ या गाण्यावर धम्माल डान्स करणार आहे.

    बिग बॉस मराठीच्या(Bigg Boss Marathi 3) घरात टास्कसोबतच ‘दादुस ऑर्केस्ट्रा – फॅशन शोभेल तुला!’ (Dadus Orchestra)हा जबरदस्त कार्यक्रम रंगणार आहे. प्रक्षेपित झालेल्या प्रोमोमध्ये(Bigg Boss Marathi 3 Promo)  दोन महिला आणि दोन पुरुष वेगळयाच गेटअपमध्ये दिसून आले. कोण आहेत हे नवीन सदस्य बिग बॉस मराठीच्या घरामध्ये, हा प्रश्न मनात येऊन गेला… पण तसं नाहीये उत्कर्ष शिंदे (Utkarsh shinde)आणि विकास पाटील(Vikas Patil) यांनी स्त्रियांचा गेटअप, तर सुरेखा कुडची आणि मीनल शाह हिने पुरुषांचा गेटअप केला आहे. चौघेही त्यामध्ये एकदम परफेक्ट दिसत आहेत असं म्हणायला हरकत नाही.

    ‘दादुस ऑर्केस्ट्रा –फॅशन शोभेल तुला!’ या कार्यक्रमात विकास पाटील ‘हृदयी वसंत फुलताना…’ या गाण्यावर मीनल शाहसोबत नृत्य सादर करणार आहे. सुरेखा कुडची यांच्यासोबत उत्कर्ष शिंदे ‘ही पोली साजूक तुपातली…’ या गाण्यावर धम्माल डान्स करणार आहे. या सगळ्यांना दादुस म्हणजेच संतोष चौधरीची साथ मिळणार आहे. घरातला माहोल एकदम हलकाफुलका होणार आहे आणि सदस्यांनी बरीच धम्माल मस्ती केलेली या प्रोमोमधून दिसून येत आहे.