Big Boss marathi 3 gayatri

बिग बॉस मराठीच्या(Bigg Boss Marathi 3) घरामध्ये मीरा आणि गायत्री यांचा ग्रुप अगदी पहिल्यापासून चर्चेत आहे. (Bigg Boss Marathi 3 latest Update) कोणतीही गोष्ट असो ते एकेमकांची साथ द्यायला पुढे मागे बघत नाहीत. कुठलंही कार्य असो वा चर्चा असो हे चौघही एकत्रच चर्चा करून काय निर्णय घेताना दिसतात, पण असं काही घरात घडलंय, ज्यामुळं गायत्री(Gayatri Datar) जरा चिंतेत आहे. ती हीच गोष्ट आज मीराला बोलून दाखवणार आहे.

    बिग बॉस मराठीच्या(Bigg Boss Marathi 3) घरामध्ये ग्रुपमधील सदस्यांची नाती बदलताना दिसत आहेत. एकेमेकांवर तितकासा विश्वास राहिलेला दिसून येत नाहीये वा कुठतरी थोडासा दुरावा आल्याचं जाणवत आहे. जय, उत्कर्ष, मीरा आणि गायत्री यांचा ग्रुप अगदी पहिल्यापासून चर्चेत आहे. (Bigg Boss Marathi 3 latest Update) कोणतीही गोष्ट असो ते एकेमकांची साथ द्यायला पुढे मागे बघत नाहीत. कुठलंही कार्य असो वा चर्चा असो हे चौघही एकत्रच चर्चा करून काय निर्णय घेताना दिसतात, पण असं काही घरात घडलंय, ज्यामुळं गायत्री(Gayatri Datar) जरा चिंतेत आहे. ती हीच गोष्ट आज मीराला बोलून दाखवणार आहे.

    गायत्री मीराला म्हणाली, मी एक ठरवलं आहे की मी काही कोणाशी बोलायला जाणार नाहीये. फक्त मी बघणार आहे या वेळेस आणि मग त्याप्रमाणं मी पुढे… जर मी राहिले या शनिवारनंतर तर मग मी त्याप्रमाणं खेळेन. मीरा म्हणाली, ऑफकोर्स तू रहाणार आहेस. गायत्री म्हणाली, काहीही होऊ शकतं. मी उत्कर्षला पण हेच म्हणत होते, की जेव्हा आपण ग्रुप ग्रुप म्हणतो, तेव्हा चल माझ्यासाठी एकच माणूस खेळू शकतो तर मग ते तू खेळशील किंवा उत्कर्ष खेळेल मला कोणीही चालेल तो प्रॉब्लेम नाहीये. पण जेव्हा स्पर्धक असतात चार लोकं तेव्हा स्पर्धकाला देखील आपल्याकडून पाठिंबा मिळता कामा नये हीसुद्धा आपलीच ड्युटी आहे ना? माझा हा मुद्दा आहे.