vishal and vikas in bigg boss marathi 3

बिग बॉस मराठीच्या(Bigg Boss Marathi 3) घरामध्ये विकास आणि विशालमधील वाद (Dispute Between Vikas And Vishal)बघता दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला असल्याचं दिसून येत आहे.

    बिग बॉस मराठीच्या(Bigg Boss Marathi 3) घरामध्ये कॅप्टन्सी टास्क(Captaincy Task In Bigg Boss Marathi 3) सुरू झाला आहे. टीमनं स्नेहा वाघ(Sneha Wagh) आणि तृप्ती देसाई (trupti Desai)यांना कॅप्टन पदाचे दोन उमेदवार घोषित केलं आहे. आता या दोघींमध्ये कोण बनणार घरचा नवा कॅप्टन? हे कळेलच.

    याचसोबत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बरीच वादावादी बघायला मिळाली. घरामध्ये जरी दोन स्ट्राँग ग्रुप असले तरीदेखील ग्रुपमधील सदस्यांमध्ये तितकासा एकेमकांबद्दल विश्वास दिसून येत नाही. मीरा आणि गायत्रीच्या संभाषणावरून हे कुठतेरी स्पष्ट झालं. तर विकास आणि विशालमधील वाद (Dispute Between Vikas And Vishal)बघता दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला असल्याचं दिसून येत आहे.

    घरामध्ये विकास जेव्हा विशालकडे टास्कबद्दल बोलायला गेला, तेव्हा विशालनं त्याला योग्य ते उत्तर न दिल्यानं विकासला वाईट वाटलं. त्यामुळं दोघांमध्ये वाद होणार आहे. विशाल विकासला म्हणाला, दोन तोंडाचा वापर नको रे एक ठाम मत दे. त्यावर विकास म्हणाला, दोन नाही दहा तोंड आहेत मला… मी रावण आहे. विशाल म्हणाला, रावणाचा शेवटी अंत झाला हे लक्षात ठेव. विकास म्हणाला, ठीक आहे चालेल अंत प्रत्येकाचा आहे, अमर कोणी नाहीये इथं सगळे मारायला आले आहेत. मरेन पण दहा तोंड असलेला रावण म्हणून मरेन, तुझ्यासारखा सामान्य माणूस म्हणून मरणार नाही. विशाल म्हणाला, “मी सामान्य माणूस आहे आणि मी खुश आहे…”