bigg boss marathi captain

बिग बॉस मराठी सिझन ४ ची (Bigg Boss Marathi Season 4) पहिली चावडी आज भरणार आहे. त्यामुळे घरातील सदस्यांचा खरा चेहरा समोर येणार आहे.

    ‘बिग बॉस मराठी’चा (Bigg Boss Marathi 4) चौथा सिझन सुरु झाला आहे. या सिझनमधील भिन्न स्वभावाच्या स्पर्धकांमुळे, त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे हे पर्व चांगलचं गाजत आहे. आज या पर्वातील पहिली चावडी (Bigg Boss Marathi Season 4 Chawadi) भरणार आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


    नुकताच ‘बिग बॉस मराठी’च्या आगामी भागाचा एक प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमोमध्ये महेश मांजरेकर म्हणत आहेत,“ मित्रांनो बघितलं ना आठवडाभरात यांना कसे एकाहून एक जबरदस्त धक्के बसलेत. जोशमध्ये गेलेल्या सर्वांचे चेहरे पहिल्याच आठवड्यात समोर येऊ लागलेत. सगळ्याचा जाब विचारला जाणार आहे. भेटूयात बिग बॉस मराठीच्या चावडीवर”.

    बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनमध्ये महेश मांजरेकर कोणाची शाळा घेणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

    समृद्धी जाधव झाली कॅप्टन
    ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सिझनची पहिली कॅप्टन समृद्धी जाधव ठरली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात पहिल्यांदाच एखादी महिला स्पर्धक पहिली कॅप्टन झाली आहे.