parkingcha king captiancy task in bigg boss marathi 4

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे पार्किंगचा किंग हे कॅप्टन्सी कार्य ! (Bigg Boss Marathi Captaincy Task) काल कॅप्टन पदासाठी  रोहित आणि अक्षय हे दोन उमेदवार मिळाले. आज या दोघांमध्ये रंगणार आहे कॅप्टन्सी कार्य.

    बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 4) चौथ्या पर्वाला सुरुवात होऊन १० दिवस उलटले आहेत. आता घरी मजा घेऊ लागली आहे. कोण आपल्यावर गेम करतंय, कोण पाठिशी खंबीरपणे उभं आहे याची प्रचिती स्पर्धकांना येऊ लागली आहे.  सर्वात महत्वाचे म्हणजे घरात लवकरच गट पडतील असेल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आता घरात खरे ट्विस्ट येतील असे दिसते आहे.

    बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे पार्किंगचा किंग हे कॅप्टन्सी कार्य ! (Bigg Boss Marathi Captaincy Task) काल कॅप्टन पदासाठी  रोहित आणि अक्षय हे दोन उमेदवार मिळाले. आज या दोघांमध्ये रंगणार आहे कॅप्टन्सी कार्य. कोण बनणार घराचा नवा कॅप्टन हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. कार्य म्हटल्यानंतर भांडणं, मारामारी हे आलंच. आज हे कार्य सदस्य कसे पार पाडतील हे आज रात्री १० वाजता कलर्स मराठीवर (Colors Marathi) प्रेक्षकांना पाहता येणार आहे.