ना आलिया, ना ईशा हैदराबादच्या ‘या’ अब्जाधीशाच्या पत्नीनं मेट गालामध्ये घातला सर्वात महागडा ड्रेस; अंबानीलाही देतेय टक्कर!

सुधा रेड्डीने मेटगाला साठी तब्बल 83 कोटींचा गाऊन आणि तब्बल 166 कोटी किंमत असलेला नेकपीस परिधान केला होता.

    जगातील सगळ्यात मोठा मेगा फॅशन इव्हेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट गाला फॅशन इव्हेंट (Met Gala 2024) 6 मेपासून न्यूयार्कमध्ये सुरू झाला आहे. या फॅशन इव्हेंटमधील अभिनेत्री आलियाच्या लूकची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र, आलियाला टक्कर देत आणखी एका भारतीय महिलेनं तिच्या हटके आणि महागड्या लूकनं सर्वांच लक्ष आपल्याकडे खेचलं आहे. तिने मेट गालामध्ये एक दोन नव्हे तर चक्क 83 कोटींचा ड्रेस घातला होता. आणि तिने घातलेल्या नकलेसची किंमत ऐकून तर तुम्ही भारतातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीची मुलगी ईशा अंबानीनं केलेल्या लूकला विसरून जाणार. कोण आहे ही भारतीय महिला आणि तिने कसा लूक केला होता जाणून घेऊ.

    मेट गाला 2024 मध्ये सेलिब्रिटींच्या लुक आणि स्टाइलसोबतच, त्यांच्या पोशाखांच्या किमतीनेही त्यांना आश्चर्यचकित केलं आहे. आलिया, ईशा प्रमाणे आणखी एका भारतीय महिला तिच्या महगड्या फॅशन चॅाईसमुळे चर्चेत आली आहे. या महिलेचं नाव आहे. सुधा रेड्डी. हैदराबादचे अब्जाधीश उद्योगपती पी.व्ही. कृष्णा रेड्डी यांची पत्नी सुधा रेड्डी. सुधा रेड्डी अनेकदा तिच्या ग्लॅमरस लुकने आणि किलर स्टाइलने लोकांना आश्चर्यचकित करते. आता मेट गालामध्ये तिने रुपयांच्या तिच्या पोशाखाने आणि दागिन्यांसह सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. सुधा रेड्डीने मेटगाला साठी तब्बल 83 कोटींचा गाऊन आणि तब्बल 166 कोटी किंमत असलेला नेकपीस परिधान केला होता. तिच्या या एकंदरीत लूक पाहता सर्वात महागड्या लूकमध्ये हजेरी लावणारी भारतीय महिला असं  म्हण्टलं तरी वावगं ठरणार नाही.

    तरुण तहलियानींनी डिसाईन केला ड्रेस

    सुधा रेड्डी यांचा मेट गालामध्ये रेड कार्पेट दिसण्यासाठी हस्तिदंती सिल्कचा गाऊन प्रसिद्ध फॅशन डिझायनर तरुण तहलियानी यांनी डिझाइन केला होता. गौतम कालरा यांनी स्टाईल केला होता. या सुंदर कस्टम मेड लाँग ट्रेल गाउनमध्ये एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे. ज्यात फ्रेंच नॉट्स, थ्रीडी बटरफ्लाय आणि काउचिंग सारख्या तपशीलांसह भरतकाम करण्यात आलं आहे. या ड्रेसला 80 कारागिरांच्या टीमने 4500 तासांच्या कालावधीत तयार केला आहे.