‘या’ बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्रीला ओळखलं का? आता हॉलिवूडमध्येही करतेय राज्य!

एक जुना बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ती १९ वर्षांची असतानाचा हा फोटो आहे. “लाजणं? त्याबद्दल कधी एकलं नाही

    अभिनेत्री प्रियांका चोप्रा वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी प्रियांका तिच्या ‘अनफिनिश्ड’ या पुस्तकामुळे चर्चेत होती. तर त्यानंतर ऑपेरा विन्फ्रेच्या प्रसिद्ध शोमध्ये तिने हजेरी लावत अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली. प्रियांकाने नुकतच अमेरिकेत ‘सोना’ तिचं पहिलं भारतीय हॉटेल सुरु कलेय. तिच्या या हॉटेलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानंतर आता एका जून्या फोटोमुळे प्रियांका चर्चेत आली आहे.

    प्रियांकाने तिचा एक जुना बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ती १९ वर्षांची असतानाचा हा फोटो आहे. “लाजणं? त्याबद्दल कधी एकलं नाही.” असं कॅप्शन देत या फोटोला तिने “बिंदी आणि बिकनी” असं हॅशटॅग दिलं आहे. प्रियांकाचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत असून आतापर्यंत या फोटोला १६ लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत.

    प्रियांका चोप्राने शेअर केलेल्या फोटोत तिने पांढरी पॅन्ट घातल्याचं दिसतंय. बोल्ड कपडे घातलेले असतानाही तिने त्यावर टिकली लावली आहे. प्रियांकाने या आधीदेखील अनेकदा बोल्ड कपड्यांवर टिकली लावणं पसंत केलंय.