sushant singh rajputs vescera report

14 जूनचा तो कला दिवस बॉलिवूडच्या गुणी अभिनेत्याला आपल्यासह कायमचा काळाच्या पडद्याआड घेऊन गेला. सुशांत आज देहरूपाने नाही पण त्याच्या आठवणीतून आणि कामातून कायमच आपल्यात जिवंत राहील.

  दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) आज दुसरा स्मृतिदिन आहे. 21 जानेवारी 1986 रोजी सुशांतचा जन्म झाला. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सुशांतच्या निधनानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. दोन वर्षानंतरही फॅन्सना अजूनही सुशांतच्या मृत्यूचं कोडं पडलेलं आहे. त्याच्या स्मृतिदिन जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही गोष्टी..

  14 जून 2020 ला घेतला जगाचा निरोप

  छोट्या पडद्यापासून करिअरची सुरवात करणाऱ्या सुशांतने अल्पवधीत मोठ्या पडद्यावर नावलौकीक मिळवला. बॉलीवूडला आजही नेपोटिझमच्या नावाने ट्रोल करण्यातं येत आणि याच बॉलिवूडमध्ये कोणत्याही गॉडफादर शिवाय आलेला हा अभिनेता त्याच्या उत्तम आणि दर्जेदार चित्रपटांमुळे ओळखला जायचा. 14 जून 2020 ला सुशांत हे जग कायमच सोडून गेला. सुशांत त्याच्या राहत्या घरी तो मृतावस्थेत आढळला होता. तो गेल्यानंतर अनेक प्रश्न फॅन्सना पडले होते. त्याच्या जाण्यानंतर बॉलिवूडच्या अनेक कलाकारांवर टीकेची झोड उठली होती. त्याची आठवण तब्ब्ल दोन वर्षांनी सुद्धा काढली जाते. त्याच्या जाण्याचं दुःख आजही एवढं आहे की यातून कोणीच सावरू शकलं नाहीये. त्याचे चाहते सुशांतला आजही तितकंच मिस करतात हे मात्र खरं.

  बॅकग्राउंड डान्सर म्हणून करियरला सुरुवात

  बॅकग्राउंड डान्सर म्हणून करियर केल्यानंतर त्याने टीव्ही इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. पवित्र रिश्ता मालिकेतून तो घराघरात पोहोचला. त्याने साकारलेली मानवच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आणि त्यानंतर बॉलिवूडमध्येही आपली छाप सोडली.

  अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं नाव

  ‘पवित्र रिश्ता’ या टीव्ही शोमध्ये सुशांत आणि अंकिता लोखंडे शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि ते दोघं अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. सुशांत आणि क्रिती त्यांच्या ‘राबता’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रेमात पडल्याच्या बातम्या आल्या होत्या. सुशांतच्या मृत्यूनंतर तो अभिनेत्री रिया चक्रवर्तीला डेट करत असल्याचे समोर आले होते.

  अनेक हिट चित्रपटांमध्ये केलयं काम

  केदारनाथ, छिछोरे, एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी, दिल बेचारा, पीके,शुद्ध देसी रोमान्स,काय पो चे यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये सुशांतनं प्रमुख भूमिका साकारली. त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.