
अक्षय म्हणतो, लग्न, “कुठल्याही तरुणीसोबत लग्न करण्यासाठी अद्याप मी मानसिकदृष्ट्या तयार झालेलो नाही. लग्न केल्यानंतर तुमचं आयुष्य पुर्णपणे बदलून जातं.
अक्षय खन्ना हा बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्यानं आजवर ‘ताल’, ‘हलचल’, ‘दिल चाहता है’, ‘रेस’, ‘हंगामा’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र ९० च्या दशकात आपल्या रोमँटिक अंदाजानं तरुणींना वेड लावणारा अक्षय अद्याप अविवाहित आहे. आज अक्षयचा ४६ वा वाढदिवस आहे.
View this post on Instagram
अभिनेत्रींसोबत रोमान्स करणाऱ्या अक्षयचं नाव अद्याप कुठल्याही अभिनेत्रीसोबत जोडलं गेलेलं नाही. या मागे काही खास कारण आहे का? असा प्रश्न वारंवार त्याला विचारलं जातो. अक्षयनं एका मुलाखतीत लग्न न करण्यामागचं खरं कारण सांगितलं.
View this post on Instagram
अक्षय म्हणतो, लग्न, “कुठल्याही तरुणीसोबत लग्न करण्यासाठी अद्याप मी मानसिकदृष्ट्या तयार झालेलो नाही. लग्न केल्यानंतर तुमचं आयुष्य पुर्णपणे बदलून जातं. स्वत:सोबतच आपल्या बायकोचा देखील विचार करावा लागतो. तुमच्या एखाद्या निर्णयाचा परिणाम तिच्या आयुष्यावर होणार तर नाही ना? याचा सखोल विचार करावा लागतो. लग्नानंतर मुलं झाली की पुन्हा आणखी एक जवाबदारी वाढते. त्यांचं शिक्षण, पालनपोषण यामध्ये तुमचा वेळ मिळतो. अन् एवढ्या सर्व जबाबदाऱ्या पुर्ण करण्यासाठी अद्याप मी तयार झालेलो नाही. त्यामुळं अद्याप मी अविवाहित आहे.”