अ‍ॅनिमलला मिळालेल्या यशाने बॉबी देओलच्या डोळ्यात आंनदाश्रू, प्रेक्षकांचे मानले आभार; व्हिडिओ व्हायरल!

अ‍ॅनिमल चित्रपटाने दोन दिवसांत भारतात 124.72 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाला मिळालेलं यश पाहून बॅाबी देओलने प्रेक्षकांचे आभार मानले.

  अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांची प्रमुख भूमिका असलेला अ‍ॅनिमल (Animal) सिनेमा 1 डिसेंबरला रिलीज झाला. सिनेमालाही चाहत्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असळ्याचं दिसत आहे. सिनेमानं पहिल्या दिवशी तब्बल 91 कोटी कमावले. आता सिनेमाचं दुसऱ्या दिवशीजवळपास 66 कोटी कमावले आहेत. फॅन्स आणि सेलेब्रिटिही चित्रपटांच कौतुक करताना दिसत आहे. या दरम्यान, आता चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या बॉबी देओलचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये चित्रपटाला मिळालेलं हे यश पाहून तो भावूक होताना दिसत आहे.

  अ‍ॅनिमल मिळालेलं यश पाहून बॉबी देओलच्या डोळ्यात आंनदाश्रू

  बॉबी देओलने अ‍ॅनिमल मध्ये नकारात्मक भूमिका साकारली आहे, ज्याला प्रेक्षकांच्या खूप पसंती मिळत आहे. प्रेक्षकांचा हा प्रतिसाद पाहता सध्या बॉबी खूप आनंदी आहे. चित्रपटाला मिळालं प्रेम पाहून बॅाबीच्या डोळ्यात पाणी आलं. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो काही लोकांना मिठी मारत आहे आणि यादरम्यान त्याच्या डोळ्यात अश्रू येतात आणि तो कारमध्ये बसून आपले अश्रू पुसतो आणि तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींकडे पाहून हसतो.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

  बॉबी देओलने चाहत्यांसोबत पाहिला ‘अ‍ॅनिमल’

  बॉबी देओलने इन्स्टाग्रामवर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो त्याच्या चाहत्यांसोबत सिनेमा हॉलमध्ये  खाली बसून चित्रपट पाहताना दिसत आहे. यासोबत त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मला #Animal कडून मिळालेल्या प्रेम आणि कौतुकाबद्दल मी कृतज्ञ आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

  अ‍ॅनिमल चित्रपटाची स्टारकास्ट

  अ‍ॅनिमल चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना यांची प्रमूख भुमिका आहे. वडिल आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून ‘A’ रेटिंग मिळाले आहे,  हा चित्रपट देखील आतापर्यंत बनवलेल्या सर्वात लांब चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचा रनटाइम अंदाजे 3 तास 21 मिनिटांचा आहे.