अतरंगी कपडे आणि बोल्ड ड्रेसिंग स्टाईलचा नाद, वादात सापडलेल्या उर्फी जावेदची संपत्ती आहे तरी किती? जाणून घ्या उर्फीची कहाणी

महाराष्ट्रात उर्फीचा नंगानाच चालू देणार नाही, असा इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी दिला आहे. जिच्याविषयी इतकी चर्चा सुरु आहे ती उर्फी जावेद नक्की कोण आहे तिची संपत्ती किती हे जाणून घेऊयात.

  बिग बॉस ओटीटीमुळे (Bigg Boss OTT) प्रसिद्धी मिळालेली उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमी आपल्या हटके कपड्यांमुळे, ड्रेसिंग स्टाईलमुळे आणि बोल्ड अवतारामुळे चर्चेत असते. ती रोज सोशल मीडियावर स्वत:चे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या तिच्या कपड्यांवर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आक्षेप घेतला आहे, महाराष्ट्रात उर्फीचा नंगानाच चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. जिच्याविषयी इतकी चर्चा सुरु आहे ती उर्फी जावेद नक्की कोण आहे तिची संपत्ती किती हे जाणून घेऊयात.

  कोण आहे उर्फी जावेद ?
  उर्फीचा जन्म 15 ऑक्टोबर 1996 साली लखनऊमधील गोमतीनगर इथे झाला. तिनं आपलं प्राथमिक शिक्षण लखनऊच्या सिटी मॉन्टेसरी स्कूलमधून पूर्ण केलं. त्यानंतर तिने लखनऊच्या एमिटी युनिव्हर्सिटीमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. तिने मास कम्युनिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे.

  घर सोडलं आणि गाठली दिल्ली
  उर्फीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ती जेव्हा अकरावीत होती तेव्हा कुणीतरी तिचे फोटो अडल्ट वेबसाईटवर अपलोड केले होते. त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला खूप त्रास दिला. तिला कुटुंबातल्या कुणीच साथ दिली नाही. नातेवाईकांनी तिला खूप ऐकवलं. हे सगळं सहन न झाल्यामुळे तिने दोन बहिणींसोबत घर सोडलं आणि दिल्ली गाठली. त्यानंतर एक आठवडा तिने एका गार्डनमध्ये घालवला. तिला एक कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली. हळूहळू तिची आर्थिक परिस्थिती चांगली होत गेली.

  मालिकेत डेब्यू
  मुंबईला जाण्याआधी दिल्लीत तिने एका फॅशन डिझायनरकडे असिस्टंट म्हणून काम केलं होतं. पुढे मग ती मुंबईत येऊन मॉडेलिंग करु लागली. अनेक फॅशन शो मध्ये तिने रॅम्प वॉकदेखील केला आहे.अनेक मालिकांच्या ऑडिशननंतर तिला ‘टेढी मेढी फॅमिली’या मालिकेद्वारे 2015 मध्ये टीव्ही इंडस्ट्रीत डेब्यू करण्याची संधी मिळाली.

  उर्फीचा जन्म एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात झाला. उर्फी जावेदच्या आईचं नाव जाकिया सुल्ताना आहे. तिच्या वडिलांचं नाव कधी पुढे आलं नाही. आसफी आणि डॉली अशी तिच्या दोन्ही बहिणींची नावं आहेत. उर्फीने लग्न केलेलं नाही आणि ती कुणाला डेटही करत नाही.

  उर्फी जावेदची संपत्ती
  उर्फी जावेदचं उत्पन्न साधारण 40 ते 55 लाखांच्या आसपास आहे. मालिकांमध्ये काम करुन आणि ब्रँड्सचं प्रमोशन करुन तिला पैसे मिळतात. ती मालिकेतील एका भागासाठी साधारण 25 ते 35 हजार इतके पैसे घेते. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ती काही ब्रँड्सचं प्रमोशनदेखील करते. यातून तिला चांगले पैसे मिळतात. मुंबईत उर्फीचा एक आलिशान फ्लॅट आहे. तिच्याकडे गाड्यांचंही चांगलं कलेक्शन आहे. तिच्याकडे असलेल्या जीप कंपास एसयुव्हीची किंमत साधारण 25 लाखांच्या आसपास आहे. ती बऱ्याचदा याच गाडीतून फिरताना दिसते.