कधी आपल्या अभिनयाने तर कधी बोल्डनेसने रसिकाने कायमच जिंकली चाहत्यांची मनं, आता हा VIDEO ठरतोय चर्चेचा विषय!

रसिकाने साकारलेली शनाया ही भूमिका तर चाहत्यांच्या कायमचं लक्षात राहिल अशी होती. या मालिकेत रसिकाने नकारात्मक भूमिका साकारल्याने सुरुवातीला प्रेक्षकांच्या टीकेची ती धनी ठरली.

  माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून घराघरात पोहचलेली शनाया म्हणजे अभिनेत्री रसिका सुनीलने आपल्या पहिल्याच मालिकेत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलय. रसिका सोशल मीडियावरही चांगलीच अ‍ॅक्टीव्ह असते. ग्लॅमर आणि बोल्ड फोटो शेअर करत ती चाहत्यांना भुरळ घालताना दिसते. तिच्या फोटोंना चाहत्यांची चांगली पसंती मिळते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

  रसिकाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हेलिकॉप्टर चालवण्याचं प्रशिक्षण घेत असतानाचा व्हिडीओ रसिकाने शेअर केला आहे. ” जेव्हा मी विमान उड्डाणंचे धडे घेत होते.” असं कॅप्शन रसिकाने तिच्या व्हिडीओला दिलंय. रसिकाच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळतेय.चाहत्यांसोबतच अनेक कलाकालांनीदेखील कमेंट करत रसिकाचं कौतुक केलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

  रसिकाने साकारलेली शनाया ही भूमिका तर चाहत्यांच्या कायमचं लक्षात राहिल अशी होती. या मालिकेत रसिकाने नकारात्मक भूमिका साकारल्याने सुरुवातीला प्रेक्षकांच्या टीकेची ती धनी ठरली. मात्र कालांतराने तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिका संपल्यानंतर रसिका सध्या सुट्टी एन्जॉय करतेय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rasika Sunil (@rasika123s)