govinda

प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आणि त्याची डान्स स्टाइल ही आजही तरूणांमध्ये लोकप्रिय आहे. कोणत्याही गाण्यावर खास स्टाईलमध्ये डान्स करणं ही तर त्याची खासियत. त्याच्या याच स्टाईलचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे आजही त्याच्यावर चित्रित झालेली गाणी प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली आहेत. नुकताच गोविंदाने आपला ५७ वा वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये पुन्हा एकदा गोविंदाचा डान्सची झलक पाहायला मिळाली.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

विराल बयानीने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर गोविंदाच्या बर्थ डे पार्टीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये गोविंदाने ‘हीरो नंबर 1’, ‘कुली नंबर 1’ या चित्रपटांमधील गाण्यांवर ताल धरला. आणि यावेळी त्याची हिरोईन झाली त्याची पत्नी. सध्या गोविंदा आणि त्याच्या पत्नीचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

गोविंदाने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये कलाविश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता शक्ती कपूर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांनीदेखील त्यांच्या स्टाइलमध्ये डान्स केला. गोविंदा हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता असून त्याचे ‘राजा बाबू’, ‘दुल्हे राजा’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘कुली नंबर 1’, ‘हीरो नंबर 1’, ‘हसीना मान जाएगी’ हे चित्रपट तुफान गाजले आहेत.