
कट्टर मांसाहारी अशी ओळख असणारा रितेश गेल्या चार वर्षांपासून शाकाहाराकडे वळला आहे. पण, आता मात्र तो म्हणतोय की मी सतत मांसाहाराबाबतच Imagine करु शकतो. आता हे कसं शक्य? तुम्हीही बुचकळ्यात पडलात ना?
पण, खरंच सध्या जेवणाच्या बाबतीत असे गट जरा अधिकच पडू लागले आहेत. त्यातच काहींच्या निवडी मात्र तिसऱ्याच गोष्टीला आहेत. कोणाला मांसाहार आवडतो पण, प्राण्यांची कत्तल नको, कोणाला मांसाहार हवा पण पर्यावरणाला इजा नको असं बरंच काही. अभिनेता रितेश देशमुखही अशाच एका गटात मोडतो.
कट्टर मांसाहारी अशी ओळख असणारा रितेश गेल्या चार वर्षांपासून शाकाहाराकडे वळला आहे. पण, आता मात्र तो म्हणतोय की मी सतत मांसाहाराबाबतच Imagine करु शकतो. आता हे कसं शक्य? तुम्हीही बुचकळ्यात पडलात ना?
तर, बॉलिवूडमधला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख Riteish Deshmukh आणि त्याची पत्नी Genelia Deshmukh या दोघांनीही मिळून आता एका नव्या व्यवसायाची सुरुवात केली आहे. ज्या माध्यमातून ते खवय्यांच्या जीभेचे चोचले पुरवणार आहेत. बरं, तेसुद्धा प्राणीमात्रांना आणि पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता.
अतिशय कल्पक आणि तितक्याच हितकारी अशा मार्गानं जात या जोडीनं Imagine Meats नावाची एक नवी संकल्पना अंमलात आणली आहे. जर्मनी, भारत आणि अमेरिकेतील तज्ज्ञांच्या मदतीनं, त्यांच्या सल्ल्यानंतर अनेक गोष्टींचे निकष पूर्ण करत या जोडीनं नव्या व्यवसायाची सुरुवात केली आहे. गणेशोत्सवादरम्यानच त्यांनी या नव्या व्यवसायाची घोषणा केली.
View this post on Instagram
प्लांट बेस्ड मीट, अर्थात वनस्पती आणि तत्सम पदार्थांपासून मांसाहाराचीच चव मिळणारे प्रोडक्ट्स या संकल्पनेअंतर्गत तयार करण्यात आले आहेत. यामध्ये बिर्याणीपासून अगदी कबाब आणि इतरही अनेक पदार्थांचे पर्याय खवय्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. इमॅजिनची स्वतंत्र अशी वेबसाईटही तयार करण्यात आली आहे, जिथं तुम्हाला हे सर्व पर्याय उपलब्ध होणार आहेत. काय मग, आहे ना रितेशची आणि त्याच्या पत्नीची ही भन्नाट आयडियाची कल्पना?