sanjay dutt taking vaccine

संजय दत्तने कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे.(sanjay dutt took corona vaccine dose) संजय दत्तने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.

    देशामध्ये कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. सर्वसामान्य माणूस असो वा सेलिब्रिटी कुणीही कोरोनापासून सुटलेला नाही. नुकतेच कार्तिक आर्यन, रणबीर कपूर, नीतू कपूर आणि अनेक सेलिब्रिटींना कोरोना होऊन गेला आहे. अशातच संजय दत्तने कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे.(sanjay dutt took corona vaccine dose) संजय दत्तने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.

    लस घेतल्यानंतर संजय दत्तने बीकेसी व्हॅक्सिन सेंटरमधील डॉक्टर्स आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.

    याआधी शर्मिला टागोर, धर्मेंद्र, जितेंद्र, सतीश शाह, परेश रावल, राकेश रोशन, जॉनी लिव्हर , कमल हसन, नागार्जुन, मोहन लाल आणि अनेक बॉलिवूड कलाकारांनी कोरोनावरची लस घेतली आहे.

    संजय दत्त अजुनही कॅन्सरला लढा देत आहे. मात्र आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. त्यांच्या आगामी ‘केजीएफ’ या चित्रपटाची लोक आतुरतेने वाट बघत आहेत. तसेच ‘पृथ्वीराज’ या चित्रपटातही ते झळकणार आहेत.