सुटलेलं पोट कमी करायचं आहे? मग अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सांगितलेली ‘ही’ सोप्पी योगासने न चुकता करा!

कोणताही योगासन करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी, कृपया तज्ञाच्या सल्ला अवश्य घ्या. जर तुम्हाला खांदा, कोपर किंवा मनगटात दुखापत असेल किंवा तुमचा पाय दुखत असेल, तर ही आसने करू नका. ज्या लोकांना ब्लड प्रेशरची समस्या आहे, त्यांनी देखील ही आसने करू नयेत.

    बॉलिवूडमधली सर्वात फिट अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. शिल्पा शेट्टीचं स्वत:च हेल्थ अपही आहे. ती नेहमी आफल्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या हेल्थ टिप्स शेअर करत असते. शिल्पाच्या फिटनेसमध्येही योगाचा मोठा वाटा आहे आणि ती नेहमी योगाची नवनवीन आसन करताना दिसत आहे.

    काय आहेत नवीन आसनं

    आपला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना शिल्पाने लिहिले की, योगाच्या या आसनांचे सामर्थ्यवान संयोजन मनगट, हात आणि खांदे यांना बळकटी देण्यास मदत करतात. ही आसने कोर स्ट्रेन्थ निर्माण करतात आणि शरीराचे संतुलन राखण्यास मदत करतात. यामुळे व्यक्तीची एकाग्रता सुधारते. ही अशी योगासने आहेत, जी संपूर्ण शरीरावर प्रभावीपणे कार्य करतात.

    हे आहेत फायदे

    योगाच्या या आसनांच्या फायद्यांविषयी, उत्थान चतुरंगा दंडासन आणि एक हस्त उत्थान चतुरंग दंडासन – या दोन्ही आसनांमुळे तुमच्या मणक्याचे हाड बळकट होते आणि मेरुदंडाच्या दोन्ही बाजूंच्या स्नायूंवरही काम होते. यासह हे आसन बेली फॅट कमी करण्यामध्येही मदत करते. हे योगासन शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. हे आसन आपल्या पोटावर, तसेच हात पायांच्या स्नायूंवर काम करते आणि त्यांना लवचिक बनवण्यात मदत करते. एकंदरीत, ही तिन्ही आसने आपल्या पोटावरील चरबी कमी करून, बॉडी टोन करण्यासाठी उपयुक्त ठरतात.